Headlines

एन. रघुरामन यांचा कॉलम:बचत आणीबाणीसाठी की तुमच्या छंदासाठी?




जगातील 57% कर्मचारी ‘पे-चेक टू पे-चेक’ म्हणजेच महिन्याच्या कमाईवर उदरनिर्वाह करत आहेत. अमेरिकेच्या एडीपीच्या ‘पीपल ॲट वर्क’ अहवालात हा खुलासा झाला आहे. अहवालानुसार इजिप्तमध्ये असे प्रमाण 84% आहे. भारतासाठी हा आकडा 76% आहे. याचा अर्थ असा नाही की सर्व लोक गरीब आहेत. याचे कारण म्हणजे उत्पन्नाचा मोठा हिस्सा दैनंदिन गरजा व जीवनशैलीवर खर्च होतो. अशा वेळी अचानक उद्भवणारी वैद्यकीय आणीबाणी, वाहन खराब होणे किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या खर्चासाठी पुरेशी बचत नसते. अहवाल सांगतो की, महिन्याच्या कमाईवर अवलंबून असणाऱ्यांपैकी 35% लोक 30 ते 40 हजारांचा आकस्मिक खर्च कर्ज घेतल्याशिवाय करू शकत नाहीत. कमी वेतन व महागाईनंतर जीवनशैलीचा खर्च हे एक मोठे कारण आहे. ही समस्या लक्षात घेऊन डेल्टा एअरलाइन्स, स्टारबक्स – ब्लॅकरॉक यांसारख्या अमेरिकी कंपन्या कर्मचाऱ्यांसाठी इमर्जन्सी सेव्हिंग्ज इनिशिएटिव्ह राबवत आहेत. याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातील एक छोटा हिस्सा नियमितपणे वेगळ्या खात्यात जमा होतो. तो केवळ आकस्मिक गरजांसाठी असतो, जेणेकरून कोणत्याही आणीबाणीच्या वेळी कर्जाची गरज भासू नये. ज्या कर्मचाऱ्यांनी इमर्जन्सी फंड तयार करण्यास सुरुवात केली, त्यांनी निवृत्तीसाठीही अधिक चांगल्या प्रकारे बचत केली. या उपक्रमामुळे निवृत्ती बचतीमध्ये 35 लाख डॉलरची अतिरिक्त रक्कम जोडली गेली, कारण त्यांना छोट्या-मोठ्या गरजांसाठी निवृत्ती फंडातून पैसे काढावे लागले नाहीत. अमेरिकेत या योजनेने बचतीचा दृष्टिकोनच बदलला आहे. आतापर्यंत असा समज होता की, कर्मचारी आधी काही बचत करतात, मग फिरणे, महागडी खरेदी किंवा इतर छंदासाठी त्या बचतीचा वापर करतात. पण ईएसआय मॉडेल वेगळे आहे. यात प्रथम आपत्कालीन परिस्थितीसाठी वेगळ्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यामुळे आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त स्थिर झाली. ताणतणाव कमी झाला आहे, कामाच्या ठिकाणी मनोबल वाढून गैरहजेरी कमी झाली. मॅनेजमेंट टिप: जर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे छंद पूर्ण करण्याऐवजी आपत्कालीन परिस्थितीसाठी बचतीस मदत केल्यास कर्मचारी आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित अनुभवतील. त्यांची कार्यक्षमताही सुधारून ते दीर्घकाळ कंपनीशी जोडलेले राहतील.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत