आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे जेथे जातात, तेथे शिस्त आणि धाडसी कारवायांची मालिका सुरू होते. सध्या अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळणारे मुंढे पुन्हा एकदा पूर्ण अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्यभरात बनावट औषधे आणि भेसळयुक्त अन्नाविरोधात एफडीएने राज्यभरात धाडींचा धडाका लावला आहे. पण, याच दरम्यान एक मोठी राजकीय आणि प्रशासकीय घडामोड घडली आहे! सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची तुकाराम मुंढे यांनी विशेष भेट घेतली. ही भेट केवळ सदिच्छा भेट नव्हती, तर त्याला एक महत्त्वाचा राजकीय आणि प्रशासकीय संदर्भ आहे. या भेटीत नेमकं काय घडलं? तुकाराम मुंढे आणि सुनेत्रा पवार यांच्यात काय चर्चा झाली तेच या व्हिडिओतून पाहुयात…