Sanjay Dutt And Madhuri Dixit Breakup : ज्येष्ठ पत्रकार ज्योती व्यंकटेश यांनी एका मुलाखतीमध्ये संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. एकत्र काम करत असताना त्यांच्यात प्रेम फुललं. मात्र, हे नातं फार काळ टिकलं नाही आणि त्यांचा ब्रेकअप झाला. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या नात्याबद्दल आजही चर्चा होते. काहीजण या ब्रेकअपसाठी माधुरीला दोष देतात, तर काहीजण संजयला. मात्र, पत्रकार ज्योती व्यंकटेश यांनी आता माधुरी आणि संजयच्या नात्याबद्दल एक महत्त्वपूर्ण खुलासा केला असून, त्यांच्यातील दुराव्याचं कारणही उघड केलं आहे.
‘खलनायक’च्या सेटवर माधुरी आणि संजय यांची भेट
ज्योती व्यंकटेश यांनी अलीकडेच सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान ज्योती व्यंकटेश म्हणाले की, ‘मैसूरमध्ये ‘खलनायक’ सिनेमाचं शुटिंग सुरू होतं, तेव्हा सुभाष घईंनी आम्हा सर्व पत्रकारांना तिथे बोलावलेलं. मी सुद्धा तिथे गेलो होतो आणि त्या दुपारी मी संजय आणि माधुरी दोघांनाही भेटलो.’
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
ज्योती यांनी सांगितलं की, संध्याकाळी एक पार्टी होती, पण माधुरी आणि संजय दोघेही तिथे नव्हते. ज्योती म्हणाले, ‘संध्याकाळी एक पार्टी होती. आम्ही सर्वजण पार्टीसाठी हॉटेलमध्ये गेलो. मी तिथे फक्त जॅकी श्रॉफ आणि सुभाष घई यांना बसलेले पाहिलं. सुभाषजी मला म्हणाले, ‘ड्रिंक्स सुरू कर!’ मी म्हणालो, ‘मी संजू आणि माधुरीची वाट बघतोय.’ त्यावर जॅकी म्हणाला, ‘संजू आणि माधुरी येणार नाहीत, ते व्यग्र आहेत.’ चित्रपटाचं शुटिंग करण्यासाठी बाहेर आले आहेत आणि ते पार्टीला का नव्हते, असा मला प्रश्न पडला. ते आले नाहीत, आणि ते काय करत होते हे मला माहीत नाही. इंडस्ट्रीतले लोक भेटतात आणि नंतर दुरावतात. त्यावेळी माधुरी आणि संजय एकमेकांच्या प्रेमात होते.’
एकमेकांच्या प्रेमात असूनही माधुरी आणि संजय यांच्यात दुरावा का निर्माण झाला, असं विचारलं असता ज्योती म्हणाले की, ‘संजय दत्त आपला शब्द पाळू शकला नाही, म्हणून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. माधुरीला वाटायचं की, संजय तिच्याशी लग्न करेल, पण संजयनं यापूर्वी एकदा लग्नातील अडचणी अनुभवल्या होत्या. त्यामुळे, त्याला पुन्हा लग्न करायचं नव्हतं.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा