![]()
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले असून, सध्या त्यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्याचा दौरा केल्यानंतर आता शहा मुंबईत दाखल झाल्याने या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यात ते दोन प्रमुख शासकीय कार्यक्रमांना हजेरी लावणार असून, भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत राजकीय आढावा बैठकही घेणार आहेत. मुंबईत अमित शहा-फडणवीस यांची भेट
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात जाऊन त्यांची भेट घेतली. मुंबईतील नियोजित बैठका आणि विविध कार्यक्रमांपूर्वी ही भेट होत असून, राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याआधी NSUI आक्रमक; अध्यक्ष प्रद्युम्न यादव पोलिसांच्या ताब्यात
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एनएसयूआयने विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत जाब विचारण्याची भूमिका घेतली होती. मात्र, त्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी एनएसयूआय मुंबईचे अध्यक्ष प्रद्युम्न यादव यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतल्याचा दावा संघटनेने केला आहे. दौऱ्यातील प्रमुख कार्यक्रम: नव्या मुख्यालयाचे उद्घाटन: आज सकाळी ११ वाजता अमित शाह यांच्या हस्ते ‘नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’च्या नवनिर्मित मुख्यालयाचे अधिकृत उद्घाटन पार पडणार आहे. सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी हे कार्यालय उभारण्यात आले आहे. शेअर बाजारात कार्यक्रम: मुंबई शेअर बाजारातील (BSE) इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांत ते बँकिंग, सहकार आणि आर्थिक क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधतील. शुक्रवारी रात्रीच झाले आगमन अमित शाह शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता विशेष विमानाने मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जंगी स्वागत केले. पुणे दौऱ्याची पार्श्वभूमी यापूर्वी अमित शाह यांनी पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यात त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना सन्मानित करण्यात आले होते. पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या दौऱ्याला विरोध करत आंदोलने केली होती. पुणे दौऱ्यात शाह यांनी राजकीय भाष्य टाळले होते, मात्र आता मुंबई दौऱ्यात ते नेमके काय बोलतात आणि भाजप नेत्यांना कोणता कानमंत्र देतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. न्यायालयावर दबाव आणण्याचा मोदींचा प्रयत्न:फुटीर खासदारांना भेटणं हा गुन्हा; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील खासदारांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली आहे. “पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी गद्दारांसाठी ‘कॅटरिंग सर्व्हिस’ सुरू केली आहे,” असा टोला लगावतानाच, फुटीर खासदारांना पाठिंबा देऊन मोदी न्यायालयावर दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. सविस्तर वाचा
Source link
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर:शहा, फडणवीस-शिंदेंची सह्याद्रीवर महत्त्वाची बैठक; राजकीय वर्तुळाचे लक्ष
