Headlines

Abhishek Sharma Smashes 233 Off 91 Balls Fans Demand India ODI Call Up Top 5 Memes Viral | २५ षटकार, १५ चौकार अन् २३३ धावा; अभिषेक शर्माच्या खेळीवर भन्नाट मीम्स व्हायरल, ‘भारताला मिळाला नवा हिटमॅन’


Abhishek Sharma Memes: अभिषेक शर्माने देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९१ चेंडूंमध्ये २३३ धावांची विक्रमी खेळी केली. त्यामुळे काही भारतीय क्रिकेट फॅन्स मीम्सच्या माध्यमातून त्याचं कौतुक करत आहेत.

New Project (29)
अभिषेक शर्मा हा आपल्या वादळी फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. कालपर्यंत तो टी-२० क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत होता, पण आता त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही तुफानी फलंदाजी करून दाखवली आहे. नुकत्याच झालेल्या एका देशांतर्गत एकदिवसीय सामन्यात त्याने केवळ ९१ चेंडूंमध्ये २३३ धावा ठोकल्या. अभिषेकची ही तुफानी फलंदाजी पाहून भारतीय क्रिकेट चाहते खुश झाले आहेत. काही जण मीम्सच्या माध्यमातून त्याचे कौतुक करत आहेत. चला तर मग पाहूया व्हायरल होणारे काही मजेशीर मीम्स.

हा सामना पंजाब राज्य आंतर-जिल्हा वरिष्ठ एकदिवसीय स्पर्धेत खेळवण्यात आला. अभिषेकने अमृतसर संघाकडून खेळताना तारणतारण संघाविरुद्ध २३३ धावा केल्या.

अभिषेक शर्माने ९१ चेंडूंमध्ये २३३ धावा केल्या. या तुफानी खेळीत त्याने १५ चौकार आणि २५ षटकार ठोकले.

मीडिया रिपोर्टनुसार, अमृतसरने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला.

या सामन्यात अभिषेक शर्माने तब्बल २५६ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली.

२३३ धावांच्या तुफानी खेळीमुळे अभिषेकला भारतीय एकदिवसीय संघात स्थान द्यावे, अशी मागणी काही क्रिकेट चाहत्यांकडून केली जात आहे.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा