Headlines

Nashik Bribe Case: नाशिक महापालिकेचा लाचखोर सहाय्यक अधीक्षक ACBच्या जाळ्यात; घरपट्टीसाठी स्वीकारले 60 हजार, प्रकरण काय? – nashik municipality corrupt assistant superintendent caught in acb trap accepted rs 60000 for gharpatti


म. टा. वृत्तसेवा, सिडको: जुने सिडको परिसरातील इमारतीतील व्यावसायिक गाळ्यांची घरपट्टी आकारणी करून देण्याच्या मोबदल्यात साठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील घरपट्टी व पाणीपट्टी विभागाचे सहाय्यक अधीक्षक मारुती भीमा डोंगरे (वय ५६) यांना प्रतिबंधक विभागाच्या लाचलुचपत प्रति पथकाने गुरुवारी पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांची जुने सिडको परिसरात निवासी, तसेच व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीतील तीन गाळ्यांची घरपट्टी आकारणी करण्यासाठी २ जुलै रोजी मारुती डोंगरे यांनी जागेवर जाऊन पाहणी व मोजमाप केले होते. त्यानंतर अनधिकृत बांधकामातील गाळ्यांची नियमित घरपट्टी आकारणी करून देण्यासाठी ७० हजार रुपये, तसेच यापूर्वी केलेल्या घरपट्टी आकारणीचे उर्वरित दहा हजार रुपये, अशी एकूण ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

Maharashtra TimesNashik Crime : दुसऱ्या बायकोचा जीव घेतला, आईला वाचवायला मध्ये पडलेल्या चिमुकल्यानेही प्राण गमावले, बापाचं टोकाचं पाऊल
वारंवार पाठपुरावा करूनही काम होत नसल्याने तक्रारदारांनी मंगळवारी (दि. ४) ‘एसीबी’कडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची पडताळणी करून पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. ६) सापळा रचण्यात आला. तडजोडीनंतर ठरलेली ६० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना डोंगरे यांना पकडण्यात आले. पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक खांडवी, हवालदार संदीप वनवे, योगेश साळवे आणि समीर शेख यांनी ही कारवाई केली.

Maharashtra TimesNashik News: आधी पत्नी आणि मुलाला संपवलं, नंतर पतीचाही जीव देण्याचा प्रयत्न; नाशिकमधील घटनेनं खळबळ
पालिकेच्या सिडको कार्यालयात यापूर्वीही कारवाई!

सुमारे दोन ते अडीच वर्षांपूर्वी याच सिडको विभागीय कार्यालयातील बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्यालाही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. त्यानंतर पुन्हा एकदा झालेल्या या कारवाईमुळे महापालिकेच्या या कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दोन सराईत जाळ्यात

नाशिकरोड : नाशिकरोड बस स्थानक आणि आर्टिलरी सेंटररोडवर २९ जुलैच्या मध्यरात्री गोळीबार आणि कारची तोडफोड करून पोलिसांना गुंगारा दिलेल्या भूषण गोसावी या सराईत गुन्हेगाराच्या टोळीतील आणखी दोन सराइतांना नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्या. सराइतांपैकी रोहित पवार याला शिर्डीतून, तर वेश बदलून फिरणारा दुसरा सराईत आयुष शिंदेला जेलरोड भागातील दसक येथे एका पेट्रोल पंपावर अटक करण्यात आली. भूषणची मैत्रीण कोमल गायकवाड (वय १९, रा. संभाजीनगर, एकलहरेरोड) हिलाही पथकाने अटक केली

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत