गेल्या काही वर्षांत अनेक लोक भारत सोडून परदेशात स्थायिक झाले आहेत, पण भारताशी त्यांचे नाते अबाधित राहिले आहे. घर असो, दुकान किंवा शेतजमीन, अनेक अनिवासी भारतीयांची भारतात मालमत्ता आहे. भारतीय कुटुंबांमध्ये वारसा हक्काचे वाद निर्माण होणे ही एक सामान्य बाब असून यादरम्यान, तुम्हीही तुमच्या मुलांना शेतजमीन हस्तांतरित करण्याचा विचार करत असाल तर FEMA आणि राज्यांचे स्थानिक कायदे माहिती असले पाहिजे.
NRI मुलांना मालमत्ता हस्तांतरणाचे नियम
फेमा नियमांनुसार, अनिवासी भारतीय म्हणजे NRIs किंवा OCI कार्डधारक भारतात थेट शेतजमीन खरेदी करू शकत नाहीत. तसलेच भेट म्हणूनही दिली जाऊ शकत नाही, पण मृत्युपत्राद्वारे वारसा हक्काने मिळालेली जमीन याला अपवाद आहे. याशिवाय मृत्युपत्रांसोबतच स्थानिक राज्य कायदे देखील या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये शेतजमीन मृत्युपत्राद्वारेसुद्धा केवळ शेतकऱ्यालाच हस्तांतरित केली जाऊ शकते.
मात्र, मुलगा शेतकरी नसल्यास मृत्युपत्र केलेले असले तरीही मालमत्तेचे हस्तांतरण करणे अवघड होते. संबंधित सरकारी अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक असेल, अन्यथा कायदेशीर अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच लक्षात घ्या की वडिलोपार्जित शेतजमिनीच्या भविष्यातील विक्रीसाठीही कडक नियम असून अशी जमीन केवळ भारतात राहणाऱ्या भारतीय रहिवाशांनाच विकली जाऊ शकते, इतरांना नाही.
New Tax Bill: किती वसूल करणार? 2000 रुपयांवरील UPI व्यवहारांवर शुल्क, युजर्सचा संताप; आता सरकारने दिले स्पष्टीकरणवारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेचा नियम
एखाद्या अनिवासी भारतीयाला वारसा हक्काने भारतातील मिळालेली मालमत्ता विकून मिळालेली रक्कम परदेशात पाठवायची असेल, तर सर्वप्रथम मृत्युपत्र किंवा कायदेशीर वारस प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसेच Tax Clearance Certificate देखील आवश्यक असून वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता दुसऱ्या अनिवासी भारतीयाकडून मिळाली असेल, तर आरबीआयची (RBI) मंजुरी आवश्यक असू शकते. म्हणजे कागदपत्रे पूर्ण असतील तर प्रक्रिया सोपी आहे, अन्यथा अडथळे येऊ शकतात.
दुसरीकडे, परदेशात जमीन विकून मिळणाऱ्या रकमेच्या हस्तांतरणावर मर्यादा घालण्यात आली आहे. एका आर्थिक वर्षात NRO खात्याद्वारे जास्तीत जास्त 10 लाख डॉलर्स पाठवता येतात, तर या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी आरबीआयची मंजुरी आवश्यक असेल.
RBI New Rules: EMI न भरल्यास बँक मोबाईल-लॅपटॉप लॉक नाही करू शकणार; कर्जदारांना RBI चा मोठा दिलासा, लोन रिकव्हरीच्या दादागिरीला लगामअशा परिस्थितीत, कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी तुम्ही हयातीत असताना जमीन विकावी आणि त्यातून मिळालेली रक्कम तुमच्या मुलांना द्यावी, असा तज्ञ सल्ला देतात. या शिवाय परदेशस्थ नागरिकांसाठी (OCIs) बिगरशेती जमीन मिळवणे खूप सोपे असते त्यामुळे, त्या जमिनीचे बिगरशेती मालमत्तेत रूपांतर करता येते.
पैसे पाठवण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत
- मालमत्ता विकल्यानंतर पैसे NRO खात्यात जमा करा
- फॉर्म 15सीए, 15सीबी आणि Repatriation Application अर्ज भरा.
- तसेच टॅक्स क्लिअरन्स, विक्रीपत्र आणि बँक स्टेटमेंट यांसारखी कागदपत्रे सादर करा.
- बँक पैशांची पडताळणी करून परदेशात पाठवेल.

