Mumbai Pune Missing Link Tunnel Fortuner Tempo Accident Tushar Bhumkar Dies from Wakad in Pimpri Chinchwad; भरधाव फॉर्च्युनरची टेम्पोला जोरदार धडक, मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा अपघात; पुण्याच्या तुषार भुमकरचा मृत्यू
Mumbai Pune Missing Link Tunnel Fortuner Tempo Accident Tushar Bhumkar Dies from Wakad in Pimpri Chinchwad; भरधाव फॉर्च्युनरची टेम्पोला जोरदार धडक, मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा अपघात; पुण्याच्या तुषार भुमकरचा मृत्यू
Mumbai Pune Expressway Missing Link Accident : मिसिंग लिंकवरच्या अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. तर, अन्य तिघे सुखरुप बचावले आहेत.
मिसिंग लिंक बोगदा तुषार भुमकर फॉर्च्युनर अपघात
बंडू येवले, पुणे (लोणावळा) : मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या (कनेक्टिंग) लिंबाच्या बोगद्यात पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगात जाणारी फॉर्च्यूनर कारपुढे जाणाऱ्या आयशर टेम्पोला जोरात धडकली. या भीषण धडकेत आयशर टेम्पोसह मार्गावर उलटला तर फॉर्च्यूनर कारचा अक्षरशः चुराडा झाला. या विचित्र भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात लोणावळ्याजवळील कुसगावच्या हद्दीत मिसिंग लिंकच्या बोगद्यात शुक्रवारी (७ ऑगस्ट) मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
तुषार भुमकरचा जागीच मृत्यू
तुषार वामन भुमकर (वय ३५, रा. वाकड, पिंपरी चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, पाच जखमींमध्ये आयशर टेम्पो चालक राजु मुडबे (रा. धाराशिव), कुलदीप पवार (रा. लातूर) हे किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच फॉर्च्यूनर कारमधील प्रदीपसह इतर तिघेजण जखमी झाले आहेत. त्यांची अद्याप समजली नाही.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार भुमकर हा त्यांच्या फॉर्च्यूनर कारने (क्रमांक -एमएच-१४/एमजी-०००७) चार मित्रांसोबत मिसिंग लिंक मार्गावरुन मुंबईकडे जात होता. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मिसिंग लिंक मध्ये भरधाव वेगात जाणाऱ्या फॉर्च्यूनर कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पुढे जाणाऱ्या आयशर टेम्पोला (क्रमांक-एमएच-०१/सीआर-७०७५) मागून जोरात धडकली. हि धडक इतकी भीषण होती की, आयशर टेम्पो मार्गावर उलटला. या भीषण धडकेत तुषार भुमकर याचा जागीच मृत्यू झाला तर फॉर्च्यूनर कारमधील चारजण जखमी झाले असून, यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच आयशर टेम्पो चालकासह एकजण किरकोळ जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच खंडाळा महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भिमसेन शिखरे यांनी सहकार्यांसह घटना स्थळी धाव घेत घटनेची पहाणी करून रस्ते विकास महामंडळाच्या यंत्रणेच्या मदतीने कार व टेम्पो मधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी नजिकच्या हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स मधून रवाना केले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून विस्कळित झालेली वाहतूक सुरळीत चालू केली. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा