Headlines

‘डोक्यावर १ कोटीचं कर्ज, मुलींच्या शिक्षणासाठी आत्मा विकला पण शरीर नाही’, ज्येष्ठ अभिनेत्री स्पष्टच बोलली


मुंबई: अनेक हिंदी सिनेमे आणि मालिकांमध्ये झळकलेल्या लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी सध्या चर्चेत आहेत.’गोलमाल’, ‘खलनायक’, ‘किंग अंकल’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांतून अन् ‘गंगा’ मालिकेतील ‘अम्माजी’च्या भूमिकेतून घराघरांत सुष्मिता मुखर्जी यांनी आपल्या आयुष्यातील एका अत्यंत कठीण प्रसंगाचा खुलासा केलाय.

सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे सुष्मिता मुखर्जी आपल्या भूतकाळातील आर्थिक अडचणींवर भाष्य करताना सांगितलं की, १ कोटी रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना आपल्या इच्छेविरुद्ध ‘सी-ग्रेड’ चित्रपटांमध्यं काम करावं लागलं होतं.

१ कोटींचे कर्ज अन् वसुली एजंटचा त्रास

सुष्मिता मुखर्जी यांनी सांगितलं की, सन २००२ मध्ये त्यांनी आणि त्यांच्या पतीने (राजा बुंदेला) सुरू केलेली ‘प्रयास प्रॉडक्शन’ ही मीडिया कंपनी तंत्रज्ञानातील बदलांमुळं दिवाळखोरीत निघाली. त्यामुळं त्यांच्यावर सुमारे १ कोटी रुपयांचं कर्ज झालं होतं. त्या काळात घरात लहान मुलं होती आणि कर्जवसुली करणारे लोक घराच्या दारावर येऊन शिवीगाळ करत असत. या अत्यंत वाईट आणि तणावपूर्ण परिस्थितीतून कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी त्यांना पुन्हा अभिनय क्षेत्रात सक्रिय व्हावं लागलं आणि मिळतील त्या भूमिका स्वीकाराव्या लागल्या.

मुलीच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च

कर्ज फेडण्यासोबतच मुलांच्या चांगल्या भविष्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. सुष्मिता यांनी सांगितलं की, त्यांची मुलगी अभ्यासात खूप हुशार होती. तिला उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. परदेशातील शिक्षण अत्यंत महागडं असल्यामुळं त्यांना पैशांची गरज होती, ज्यासाठी त्यांनी समोर आलेल्या कामांच्या दर्जाचा विचार न करता ते स्वीकारावं लागलं.

Maharashtra TimesUsha Nadkarni Life Story: वडिलांनी केला कोयत्यानं हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, मुलगा आजही आई मानत नाही; ८० व्या वर्षी एकाकीपण,अभिनेत्री उषा नाडकर्णींच्या आयुष्यात घडलंय बरंच काही
मी माझा आत्मा विकला, पण शरीर विकलं नाही

आपल्या या निर्णयांबद्दल बोलताना सुष्मिता मुखर्जी म्हणाल्या की, लोकांनी मला विचारलं की मी अशा महिलांचा अपमान करणाऱ्या, त्यांना चुकीच्या पद्धतीनं सादर करणाऱ्या सी-ग्रेड आणि वाईट चित्रपटांत काम का केलं? मला आजही ते आठवून त्रास होतो.

Maharashtra TimesSohail Khan Alliance: सोहेल खान ठरला ‘बाजीगर’, ‘अलायन्स’चा विजेता न होताही कमावला बक्कळ पैसा, एका एपिसोडसाठी मिळालंय बक्षिसाच्या रक्कमेपेक्षाही अधिक मानधन
मी वाईट चित्रपट केले, पण नको ते सिनेमे केली नाही. त्या काळात मी माझा आत्मा विकला का? तर हो, मी माझा आत्मा विकला, पण शरीर नाही विकलं. मला तेव्हाही ते आवडत नव्हतं आणि आजही आवडत नाही, पण ती माझी अडचण होती.

निर्णयांचा पश्चात्ताप नाही

३ ते ४ वर्षांच्या अथक मेहनतीनंतर त्यांनी आणि त्यांच्या पतीने १ कोटी रुपयांचं कर्ज पूर्णपणे फेडलं. आज त्यांची मुले स्वतःच्या पायावर उभी आहेत.त्या म्हणाल्या की, कुटुंबासाठी आणि मुलांच्या भवितव्यासाठी घेतलेल्या या कठीण निर्णयांचा त्यांना आता कोणताही पश्चात्ताप नाही. सध्या परिस्थिती बदलली असून, त्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये सन्मानानं काम करत आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत