Maharashtra Monsoon Death: सध्या राज्यात १७ एनडीआरएफ आणि सहा एसडीआरएफ अशी एकूण २३ बचाव पथके तैनात असून, संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सादरीकरणात नमूद आहे.

राज्यात यंदाच्या मान्सूनमध्ये अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यातून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा आढावा सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्या वेळी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने सादर केलेल्या सविस्तर सादरीकरणात जुलै महिन्यातील दुर्घटनांची आकडेवारी मांडण्यात आली.
Mumbai BEST Bus: ‘बेस्ट’चा होणार कायापालट! मुंबईतील 22 बस आगारांच्या आधुनिकीकरणाचा निर्णय
२८ जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीतच राज्यात पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना सर्वाधिक गंभीर ठरली. याशिवाय यवतमाळ, धुळे, बुलढाणा आणि सोलापूर जिल्ह्यांत पुराच्या पाण्यात वाहून जाण्याच्या घटनांमुळेही जीवितहानी झाली आहे.
५०५ जनावरांचा मृत्यू
कारण मृत्यू
वीज पडून—- ५३
भिंत पडून—- ३५
झाड पडून—- २१
पुरात वाहून—- २१
दरड कोसळून—- ७
एकूण—- १३७
पनीरसारखे दिसणारे ‘अॅनालॉग’ हद्दपार! साठवणूक, वाहतूक, वितरणावर एक वर्षासाठी प्रतिबंध; FDAचा निर्णय
५०५ जनावरांचा मृत्यू
जुलै महिन्याच्या कालावधीत राज्यभरात ५०५ प्राण्यांचा मृत्यू झाला असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. या अहवालानुसार या कालावधीत वीज पडून, गारपीट, झाड पडून, भिंत पडून आणि आग लागून या जनावरांच्या झालेल्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
धरणांतील मंगळवारचा पाणीसाठा
धरण— उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये)— टक्केवारी
खडकवासला १.९७— १००
पानशेत १०.६५— १००
वरसगाव १२.८२— १००
टेमघर ३.६६— ९८.६४
भामा आसखेड ७.५६— ९८.६६
पवना ८.२७— ९७.१४
मुळशी १७.९८— ९७.४२
चासकमान ७.५३— ९९.३६
नीरा देवघर ११.४५— ९७.६४
भाटघर २३.५०— १००
वीर ९.२१— ९७.८५
कोयना ८७.२४— ८९.४३
उजनी ५२.२२— ९७.६४
जायकवाडी ६८.५६—८९.४३
भंडारदरा १०.२१— ९५.०४
(स्रोत : जलसंपदा विभाग, राज्य सरकार)

