![]()
उत्तर : महानगर गॅस लिमिटेडकडून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, लातूर ,धाराशिव, चित्रदुर्ग आणि देवनगेरे या भागांत गॅसपुरवठा केला जातो. सध्या सुमारे ५ दशलक्ष क्युबिक मेट्रिक गॅसचा पुरवठा केला जात आहे.
प्रश्न : पुढील काही वर्षांसाठी पीएनजी पुरवठ्याचे लक्ष्य काय आहे?
उत्तर : पुढील तीन ते चार वर्षांत घरगुती स्तरावर ९० ते ९५ टक्के पीएनजी पुरवठा करण्याचे आमचे लक्ष्य आहे. सध्या महानगर क्षेत्रात सुमारे ८० ते ८५ टक्के घरगुती पीएनजी पुरवठा होत आहे. हे प्रमाण आणखी वाढवण्यासाठी महानगर गॅस लिमिटेडतर्फे प्रयत्न सुरू आहेत.
प्रश्न : इराण-अमेरिका संघर्षाचा गॅसपुरवठ्यावर काही परिणाम झाला का?
उत्तर : इराण-अमेरिका संघर्षामुळे पीएनजी किंवा सीएनजी पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. कोणत्याही स्वरूपात गॅसपुरवठ्यात कमतरता राहू नये, यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात आले असून ते यशस्वी ठरले आहेत.
प्रश्न : केंद्र सरकारने पीएनजी पुरवठा वाढवण्याचा निर्णय का घेतला?
उत्तर : आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे मध्यंतरी गॅस सिलिंडर पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पीएनजी पुरवठा अधिक व्यापक स्तरावर वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महानगर गॅस लिमिटेडकडून कामे वेगाने सुरू आहेत.
प्रश्न : पावसाळ्यात पीएनजीसाठी चर खणण्यास परवानगी मिळाली आहे का?
उत्तर : होय. मुंबई महापालिकेने पावसाळ्यातही पीएनजी पुरवठ्यासाठी चर खणण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सर्वतोपरी काळजी घेत कामे हाती घेण्यात आली आहेत.
प्रश्न : ९० ते ९५ टक्के पीएनजी पुरवठ्याचे लक्ष्य कसे गाठणार?
उत्तर : नवीन वसाहती, झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प म्हणजेच एसआरए प्रकल्प आणि इतर नव्या गृहनिर्माण क्षेत्रांमध्ये पीएनजी जोडण्या वाढवण्यात येणार आहेत. यंदाच्या वर्षात सहा लाख घरांत पीएनजी पुरवठा करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
प्रश्न : चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये पीएनजी पुरवठा केला जात नाही. या धोरणात बदल होईल का?
उत्तर : पीएनजी पुरवठा करताना सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. ज्या भागांत सुरक्षिततेची सर्व निकष पूर्ण होतात, तिथे आम्ही पुरवठा देतो. आपत्कालीन परिस्थिती, पाइपलाइनची सुरक्षितता, प्रवेशमार्ग आणि इतर सर्व घटकांचा विचार करूनच गॅसपुरवठा केला जातो.
प्रश्न : महानगर गॅसची पाइपलाइन यंत्रणा किती मोठी आहे?
उत्तर : मुंबई महानगरात महानगर गॅसची सुमारे ८ हजार किलोमीटर इतके विस्तृत वाहिन्यांचे जाळे आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून घरगुती, व्यावसायिक आणि वाहनांसाठी गॅसपुरवठा केला जातो.
प्रश्न : सध्या किती ग्राहकांना पीएनजी आणि सीएनजी पुरवठा केला जातो?
उत्तर : सध्या सुमारे ३० लाख घरगुती पीएनजी ग्राहक आहेत. तसेच १२ लाख वाहनांमध्ये सीएनजी वापरला जातो. घरगुती ग्राहकांप्रमाणेच सुमारे सहा हजार रेस्तराँमध्येही पीएनजी पुरवठा केला जात आहे.
प्रश्न : नैसर्गिक गॅसचा पुरवठा देशांतर्गत होतो की आयातीवर अवलंबून आहे?
उत्तर : नैसर्गिक गॅसचे सुमारे ५० टक्के उत्पादन देशांतर्गत होते, तर उर्वरित ५० टक्के गॅस आयात केला जातो. आयात होणारा गॅस कतार ,अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि इतर विविध देशांमधून येतो.
प्रश्न : सीएनजी पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत किती स्वस्त आहे?
उत्तर : सीएनजी हा डिझेलच्या तुलनेत सुमारे २० टक्के आणि पेट्रोलच्या तुलनेत सुमारे ४० टक्के स्वस्त ठरतो. त्यामुळे वाहनधारकांसाठी तो किफायतशीर पर्याय आहे.
प्रश्न : सीएनजी दरांवर कोणते घटक परिणाम करतात?
उत्तर : वाहनांना पुरवल्या जाणाऱ्या सीएनजी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी, काही प्रमाणात आयात केलेला एलएनजी सीएनजीमध्ये मिसळावा लागतो. त्यावरील खर्चामुळे दरांवर परिणाम होतो. तसेच, आणीबाणीच्या परिस्थितीत किंवा आंतरराष्ट्रीय अस्थिरतेच्या काळात दर वाढू शकतात.
प्रश्न : महानगरात सध्या किती सीएनजी पंप आहेत आणि विस्ताराचा आराखडा काय आहे?
उत्तर : महानगर क्षेत्रात सध्या ५२० सीएनजी पंप आहेत. येत्या काळात त्यात आणखी ७५ पंपांची भर घालण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सरकार आणि विविध सरकारी संस्थांशी संपर्क साधला असून त्यांच्या अखत्यारीतील जागा उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.
प्रश्न : भविष्यात गॅसपुरवठा व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे का?
उत्तर : निश्चितच. गॅससंदर्भातील तक्रारींचा आढावा घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा प्रभावी वापर केला जात आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षिततेचे धोरण अधिक सक्षम करण्यावर आमचा भर
———————————–
(मुलाखत: हेमंत साटम)
