Sunil Gavaskar On Ajinkya Rahane : मराठमोळा क्रिकेटर अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज सुनील गावसकर यांनी रहाणेचे कौतुक केले आहे. पण त्याचवेळी त्यांनी भारताच्या क्रिकेटबद्दल एक कटू सत्यही सांगितले.
सुनील गावसकर
मुंबई : भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २०२३ पासून तो भारतीय संघाबाहेर होता. निवृत्तीनंतर आता माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी रहाणेबाबत मोठं विधान केलं आहे. भारतीय क्रिकेटमध्ये रहाणेला त्याच्या कामगिरीचं योग्य श्रेय कधीच मिळालं नाही, अशी खंत गावसकरांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी रहाणेची तुलना माजी कर्णधार राहुल द्रविडशीही केली.
‘रहाणेला हवं तितकं श्रेय मिळालंच नाही’
‘मिड-डे’मधील आपल्या लेखात लिहिताना गावसकर म्हणाले, “कर्णधार म्हणून रहाणेचा विक्रम उत्कृष्ट आहे. त्याने सहा कसोटी सामन्यांत भारताचं नेतृत्व केलं. त्यापैकी चार सामने भारताने जिंकले, तर दोन अनिर्णित राहिले. एकाही सामन्यात पराभव झाला नाही.”
ते पुढे म्हणाले, “राहुल द्रविडलाही कर्णधार म्हणून काही मोठे विजय मिळाले होते. पण त्यालाही हवं तितकं श्रेय मिळालं नाही. रहाणेच्या नेतृत्वाबाबतही हेच घडलं.”
गावसकरांनी भारतीय क्रिकेटमधील वास्तवावरही भाष्य केलं. “भारत जिंकला की श्रेय फलंदाज किंवा गोलंदाजांना मिळतं. पण संघ हरला की टीका मात्र कर्णधार आणि प्रशिक्षकांवर होते,” असं त्यांनी म्हटलं.
ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक मालिकेची आठवण
२०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अॅडलेड कसोटीत भारत अवघ्या ३६ धावांत गारद झाला होता. त्यानंतर विराट कोहली रजेवर मायदेशी परतला. अशा कठीण परिस्थितीत रहाणेने संघाचं नेतृत्व स्वीकारलं.
मेलबर्न कसोटीत त्याने ११२ धावांची शतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजासह अनेक प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे बाहेर असतानाही भारताने ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवत २-१ अशी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली.
गावसकर म्हणाले, “३६ धावांत संघ बाद झाल्यानंतर रहाणे आणि तत्कालीन मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघाला सावरलं. बुडण्याच्या मार्गावर असलेलं जहाज त्यांनी सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचवलं. गाबावर भारताला पहिल्यांदाच विजय मिळवून देत मालिकाही जिंकली. रहाणे उंच माथ्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे आणि क्रिकेटप्रेमी त्याचे कायम ऋणी राहतील.”
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा