Headlines

Trump Statement on Iran Talks; US Ready for Diplomacy


वॉशिंग्टन डीसी/तेहरान/तेल अवीव3 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की, अमेरिका आणि इराण यांच्यात सोमवारपासून पुन्हा चर्चा सुरू होईल. एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ही चर्चा मध्यस्थांमार्फत होईल.

ट्रम्प म्हणाले, “आम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा कारवाई करू शकतो, पण मला लोकांना मारायचे नाही. करार झाला तर अनेक जीव वाचतील. चर्चेचा काय परिणाम होतो ते पाहूया.”

ट्रम्प यांच्या मते, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि इराण यांच्याशी झालेल्या राजनैतिक चर्चेनंतर त्यांनी इराणवरील प्रस्तावित मोठा हल्ला पुढे ढकलला. त्यांनी दावा केला की, चर्चेत होर्मुझ सामुद्रधुनी आणि इराणच्या अणुकार्यक्रमासारख्या कळीच्या मुद्द्यांवरही चर्चा होईल.

मात्र, इराणने ट्रम्प यांचे अनेक दावे फेटाळून लावलेत. इराणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, होर्मुझ सामुद्रधुनीबाबत अद्याप कोणताही औपचारिक करार झालेला नाही.

इराण युद्धाशी संबंधित अपडेट्ससाठी खालील ब्लॉगमधून जा…

लाइव्ह अपडेट्स

4 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

ट्रम्प म्हणाले- सौदी, कतार, यूएईच्या विनंतीवरून इराणवरील नियोजित हल्ला थांबवला

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी रात्री खुलासा केला की, सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या विनंतीमुळे त्यांनी इराणवर करण्यात येणारा नवीन हल्ला रद्द केला. ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिकन सैन्य दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते, परंतु त्यांनी ऐनवेळी मुत्सद्देगिरीला (diplomacy) संधी देण्याचा निर्णय घेतला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत