Headlines

Free TV Sofa and Dishwasher Canadas Viral Trend Amazes the Internet Video Viral | फ्रीमध्ये मिळत आहेत टीव्ही, सोफा आणि डिशवॉशर; हवी ती वस्तू उचला आणि घरी न्या, कॅनडामधील भारतीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल


Viral Instagram Video: कॅनडामध्ये घरातील वापरात नसलेल्या, पण चांगल्या स्थितीतील वस्तू घराबाहेर ठेवून त्या गरजू लोकांना मोफत देण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. भारतीय महिलेनं शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Canada Viral Trend
(फोटो सौजन्य – ruman_tarun/Instagram)
भारतामध्ये घरात दरोडा पडला आणि चोरांना पैसे किंवा दागिने सापडले नाहीत, तर ते फर्निचर किंवा घरातील टीव्ही, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन पळतात. अशा कितीतरी चोऱ्यांबद्दल तुम्ही ऐकलं असेल किंवा त्यासंबंधीचे व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. पण कॅनडामध्ये लोक स्वतःहून घरातील फर्निचर, टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू अगदी मोफत देत आहेत. कोणीही या आणि कोणालाही न विचारता सामान घेऊन जा. होय, विश्वास बसत नसेल तर हा व्हायरल व्हिडीओ पाहाच. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

फुकटात मिळाला सोफा आणि टीव्ही

​ ​

हा व्हिडीओ ruman_tarun या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ७४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कॅनडामध्ये एक नवा ट्रेंड सुरू झाला आहे. या ट्रेंडनुसार लोक घरातील वापरात नसलेल्या, पण चांगल्या स्थितीतील वस्तू घराबाहेर ठेवतात. गरजू लोक त्या वस्तू कोणालाही न विचारता मोफत घरी घेऊन जाऊ शकतात.

एका भारतीय जोडप्याने या वस्तू आपल्या व्हिडीओमध्ये दाखवल्या आहेत. त्यांना टीव्ही, सोफा, डिशवॉशर आणि बार्बेक्यू मशीन अगदी मोफत मिळाली. लक्षवेधी बाब म्हणजे या वस्तू अगदी नव्यासारख्या आणि सुस्थितीत आहेत. भारतात अशा वस्तू घराबाहेर एक रात्र ठेवल्या, तर त्या चोरीला जाण्याची शक्यता जास्त असते.

भारतामध्ये असा ट्रेंड कसा येणार?

​ ​

हा व्हिडीओ पाहून बहुतांश नेटकरी अवाक् झाले आहेत. कारण भारतात अशा प्रकारचा ट्रेंड क्वचितच पाहायला मिळतो. मात्र, कॅनडा हा आर्थिकदृष्ट्या समृद्ध देश मानला जातो. तिथे लोकसंख्या तुलनेने कमी असून अनेक नागरिकांची आर्थिक परिस्थितीही चांगली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे ट्रेंड तिथे सहज शक्य होतात. असो, या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा