Headlines

गरोदर पत्नीसह देवदर्शनाला पोहोचला सूरज चव्हाण; संजनाच्या ब्लाऊजवरील ‘आई मरी माते’च्या पॅचवर्कची रंगली चर्चा – bigg boss marathi winner suraj chavan visits mari mata temple with wife sanjana her unique blouse design steals spotlight


‘बिग बॉस मराठी 5’मधील विजयानंतर सूरजच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली असून, त्याच्या प्रत्येक अपडेटवर चाहते बारकाईने लक्ष ठेवून असतात. सोशल मीडियावर तो आपल्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षणही चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्यामुळे त्याच्या प्रत्येक पोस्टप्रमाणेच या देवदर्शनाच्या फोटोंनीही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan
फोटो सौजन्य :- @official_suraj_chavan1151, @99nileshhh_ @_cinematic_nd
बिग बॉस मराठी 5’चा विजेता आणि लोकप्रिय रीलस्टार सूरज चव्हाण सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पत्नी संजना चव्हाण सध्या गरोदर असून, बाळाच्या आगमनापूर्वी या दाम्पत्याने आई मरी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या खास धार्मिक भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, चाहत्यांकडून त्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बाळाच्या जन्मापूर्वी देवाचे आशीर्वाद घेण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये पाळली जाते. त्याच भावनेतून सूरज आणि संजनानेही आई मरी मातेच्या चरणी नतमस्तक होत सुखरूप प्रसूती आणि बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले जात आहे.
मंदिरातील त्यांच्या साधेपणाने आणि भक्तिभावाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या देवदर्शनावेळी केवळ सूरज आणि संजनाची उपस्थितीच चर्चेचा विषय ठरली नाही, तर संजनाच्या पारंपरिक लूकनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने नेसलेली आकर्षक साडी, पारंपरिक दागिने आणि साधा मेकअप यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती तिच्या ब्लाऊजवरील अनोख्या डिझाइनची. विशेष म्हणजे ब्लाऊजच्या मागील बाजूस ‘आई मरी माते’चे आकर्षक पॅचवर्क करण्यात आले होते. (फोटो सौजन्य :- @official_suraj_chavan1151, @99nileshhh_ @_cinematic_nd)

आई मरी मातेच्या दर्शनासाठी पोहोचले सूरज-संजना

आई मरी मातेच्या दर्शनासाठी पोहोचले सूरज-संजना

बाळाच्या आगमनापूर्वी अनेक जोडपी आपल्या कुलदैवताचे किंवा श्रद्धास्थानाचे दर्शन घेतात. त्याच परंपरेनुसार सूरज चव्हाण आणि त्याची पत्नी संजना यांनी आई मरी मातेच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. मंदिरात दर्शन घेतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही अत्यंत साध्या आणि पारंपरिक वेशभूषेत दिसत आहेत.सूरजने साधा पारंपरिक पोशाख परिधान केला होता, तर संजनाने सुंदर साडी, पारंपरिक दागिने आणि हलका मेकअप करून आपला लूक पूर्ण केला होता. तिचा हा साधेपणा अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतरला.

संजनाच्या ब्लाऊजवरील पॅचवर्कची जोरदार चर्चा

संजनाच्या ब्लाऊजवरील पॅचवर्कची जोरदार चर्चा

देवदर्शनाच्या फोटोंमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती संजनाच्या ब्लाऊजची. ब्लाऊजच्या मागील बाजूस ‘आई मरी माते’ची आकर्षक प्रतिमा पॅचवर्कच्या माध्यमातून साकारण्यात आली होती. या कलाकुसरीमुळे तिच्या पारंपरिक लूकला वेगळी ओळख मिळाली.सामान्य भरतकामापेक्षा वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आलेले हे पॅचवर्क अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. धार्मिक श्रद्धा आणि फॅशन यांचा सुंदर संगम या डिझाइनमधून पाहायला मिळाल्याचे अनेकांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

सूरज आणि संजनाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. “देव तुमच्या बाळाला उत्तम आरोग्य देवो”, “खूप सुंदर जोडी”, “संजनाचा लूक अप्रतिम आहे”, “ब्लाऊजवरील आई मरी मातेचे डिझाइन खूपच सुंदर दिसत आहे”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या.काही चाहत्यांनी या डिझाइनची कल्पना अनोखी असल्याचे सांगत पारंपरिक पोशाखात अशा धार्मिक कलाकृती पाहायला मिळणे आनंददायी असल्याचे मत व्यक्त केले.

गरोदरपणातील खास क्षणांचा आनंद

गरोदरपणातील खास क्षणांचा आनंद

संजना सध्या गरोदर असून, या नव्या प्रवासातील प्रत्येक खास क्षण सूरज तिच्यासोबत साजरा करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दोघांच्या बेबी शॉवरचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता देवदर्शनाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांना पुन्हा एकदा या जोडप्याचा साधेपणा आणि श्रद्धा पाहायला मिळाली.सूरज आणि संजना दोघेही त्यांच्या आयुष्यातील या नव्या पर्वासाठी उत्सुक असून, चाहत्यांनाही त्यांच्या घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याची उत्सुकता लागली आहे.

बिग बॉसनंतर वाढली लोकप्रियता

बिग बॉसनंतर वाढली लोकप्रियता

‘बिग बॉस मराठी 5’चे विजेतेपद पटकावल्यानंतर सूरज चव्हाणच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग तयार झाला असून, तो आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतो.यामुळे त्याच्या प्रत्येक पोस्टला हजारो लाइक्स आणि कमेंट्स मिळतात. देवदर्शनाचे फोटोही त्याला अपवाद ठरले नाहीत. अनेकांनी त्याच्या साधेपणाचे आणि कुटुंबासोबतच्या नात्याचे कौतुक केले.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा