Ramesh Mhatre Shiv Sena Corporator says wont pressurize Victim in Dombivli Doctor Case Crime News; पीडित-साक्षीदारांवर दबाव टाकणार नाही, राज्याबाहेर जातो, पण जामीन द्या; शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांचे कोर्टात गयावया
Ramesh Mhatre Shiv Sena Corporator says wont pressurize Victim in Dombivli Doctor Case Crime News; पीडित-साक्षीदारांवर दबाव टाकणार नाही, राज्याबाहेर जातो, पण जामीन द्या; शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांचे कोर्टात गयावया
Ramesh Mhatre beaten up Dombivli Doctor Case : ‘माझ्याकडून धमक्या जाण्याचा प्रश्नच नसून मी चार-सहा आठवड्यांसाठी राज्याबाहेर राहण्यासही तयार आहे’ अशी विनवणी डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील शिवसेनेचे आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाला केली.
रमेश म्हात्रे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे : ‘मी गजाआड असल्याने पीडित व साक्षीदारांना माझ्याकडून कोणत्याही धमक्या जाण्याची आणि दबाव टाकला जाण्याची शक्यताच नाही. शिवाय पोलिसांचा तपास बऱ्याच अंशी मजबूत झाला आहे. त्यामुळे मला हवे तर चार-सहा आठवड्यांसाठी राज्याबाहेर राहण्याची अट घालावी, पण जामीन मंजूर करावा’, अशी विनवणी डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील शिवसेनेचे आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाला केली. तरीही अद्याप मूळ तक्रारदार डॉक्टरकडून आरोपींची ओळखपरेड होणे आणि पोलिसांकडून काही साक्षीदारांचे जबाब व पुरावे गोळा होणे बाकी असल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना जामीन दिलासा दिला नाही. ६ ऑगस्टला त्याविषयी विचार करण्याचे संकेत न्यायालयाने दिले. Tukaram Mundhe : मंत्रालय-विधानभवनाच्या कँटीन फ्रीजपेक्षा चप्पल स्टँड स्वच्छ, सरकारी आस्थापनांवर कारवाई का नाही? कोर्टाने FDA ला झापलं
पीडित व साक्षीदारांवर दबाव
याचबरोबर, मूळ तक्रारदार डॉ. वैभव साळुंखे यांच्यासह पीडित व साक्षीदारांना संरक्षण द्या, असे निर्देश प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने सरकारला दिले. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’तर्फे ज्येष्ठ वकील एस. यू. कामदार यांनी म्हात्रेंच्या जामिनाच्या विनंतीला विरोध दर्शवला. ‘म्हात्रेंच्या कृतीने पालिका रुग्णालयातील अन्य डॉक्टरांच्या मनातही दहशत बसली आहे. यापूर्वी अशा अनेक गुन्ह्यांतून ते साक्षीदारांवर दबाव टाकून निर्दोष सुटले. आताही पीडित व साक्षीदारांवर दबाव आहे. ’, असे म्हणणे कामदार यांनी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर मांडले.
संदीप क्षीरसागर यांचा विजयसिंह पंडित यांना टोला; सुनेत्रा पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान तक्रार
‘माझ्याकडून धमक्या जाण्याचा प्रश्नच नाही. शिवाय मी चार-सहा आठवड्यांसाठी राज्याबाहेर राहण्यासही तयार आहे. त्यामुळे तपास सुरू असताना मला जामीन दिला जाऊ शकतो’, असा युक्तिवाद म्हात्रेंनी ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांच्यामार्फत मांडला. तर, ‘न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिस उपायुक्तांनी तपास हाती घेतला असून आतापर्यंत एकूण २६ जणांचे जबाब नोंदवले आहेत. आणखी अनेकांचे जबाब नोंदवण्यासह अनेकांचे आवाजाचे नमुने घेणे आणि पीडितांनी दिलेले व्हिडीओ फॉरेन्सिकला पाठवणे इत्यादी प्रक्रिया दोन आठवड्यांत करू. डॉ. साळुंखेंना पोलिस संरक्षणात डोंबिवलीत आणून आरोपींची ओळख परेड करून घेऊ’, अशी ग्वाही पोलिसांनी महाधिवक्ता मिलिंद साठे यांच्यामार्फत दिली.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा