Headlines

alzarri joseph daren sammy fight pakistan vs west indies test series ; हेड कोच खोटं बोलतोय! वेस्ट इंडिज क्रिकेटमधील वाद चव्हाट्यावर, डॅरेन सॅमीला अल्झारीचा कडक रिप्लाय, नेमकं प्रकरण काय?


पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये नवा वाद समोर आला आहे. अल्झारी जोसेफने प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांच्या वक्तव्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

alzarri joseph sammy fight west indies test series
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : सध्या पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने जिंकला आहे. पण आता वेस्ट इंडिज संघातून एक मोठा वाद समोर येत आहे. हा वाद हेड कोच डॅरेन सॅमी आणि स्टार वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ यांच्यात रंगला आहे. अल्झारीने थेट आपल्याच कोचच्या विधानावर प्रश्न उपस्थित करत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

डॅरेन सॅमी काय म्हणाले होते?

मालिका सुरू होण्यापूर्वी हेड कोच डॅरेन सॅमी यांनी एक विधान केले होते. ते म्हणाले होते, “आम्हाला अल्झारी जोसेफला या मालिकेसाठी संघात घ्यायचे होते. पण त्याने स्वतःच या दौऱ्यावर येण्यास नकार दिला.” सॅमी यांच्या या दाव्यामुळे वेस्ट इंडिजच्या चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली होती.

अल्झारी जोसेफचा सॅमींवर पलटवार

आता एका स्पोर्ट्स शोमध्ये बोलताना अल्झारी जोसेफने सॅमी यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. अल्झारी म्हणाला, “माझ्यात आणि हेड कोचमध्ये या विषयावर चर्चा झाली होती. पण मी खेळत नसल्याचे मुख्य कारण माझी फिटनेस होती. सॅमी दीर्घकाळापासून क्रिकेट खेळत आहेत. अशा वक्तव्याचा काय परिणाम होतो, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. मी त्यांच्या या विधानाशी अजिबात सहमत नाही.”

Maharashtra TimesJasprit Bumrah : बुमराहचं वादळ परतणार, भेदक माऱ्यापुढे श्रीलंका ढेपाळणार! जसप्रीत फिटनेसमध्ये पास, पण टीमसाठी चिंता कायम, कारण काय?

“माझ्या शरीराला विश्रांतीची गरज होती”

आपल्या दुखापतीबद्दल बोलताना अल्झारी म्हणाला, “मी स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे जवळपास वर्षभर मैदानाबाहेर होतो. दुखापतीतून परतल्यानंतर मी लगेच दोन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने सलग खेळलो. एवढ्या सामन्यांनंतर माझ्या शरीराला विश्रांतीची गरज होती. माझी बॉडी मला आणखी खेळण्याची परवानगी देत नव्हती. मूळ कारण समजून न घेता डॅरेन सॅमी यांनी दिलेले हे विधान चुकीचे आणि वादग्रस्त आहे.”

नात्यांवर परिणाम होणार नाही

अल्झारीने पुढे स्पष्ट केले की, “मी एक व्यावसायिक खेळाडू आहे. वेस्ट इंडिजसाठी खेळणे मी पुढेही चालूच ठेवेन. या वादाचा डॅरेन सॅमींसोबतच्या माझ्या वैयक्तिक संबंधांवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. पण त्यांनी जे विधान केले, ते योग्य नव्हते.”

Maharashtra TimesAjinkya Rahane News : 20 वर्षांचा प्रवास, निवृत्तीआधीचा प्रसंग, अजिंक्यच्या पत्नीनं इमोशनल पोस्टमधून मन मोकळं केलं, प्रत्येक शब्द बोलका!

२ ऑगस्टला रंगणार दुसरी कसोटी

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील दुसरी कसोटी २ ऑगस्टपासून पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवली जाणार आहे. पण त्याआधीच खेळाडू आणि कोच यांच्यातील हा वाद चव्हाट्यावर आल्याने वेस्ट इंडिज क्रिकेटमधील अंतर्गत गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.