मुंबई: बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय बॉलिवूडमध्ये सक्रिय नसला तरी आता तो आणि यशस्वी व्यावसायिक म्हणून चर्चेत असतो. विवेक आता दुबईतील रिअल इस्टेट क्षेत्रात काम करतोय. गेल्या काही वर्षात त्यानं या क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता त्यानं वैयक्तिक आयुष्य तसंच व्यावसायिक क्षेत्रात काम करत असताना येणाऱ्या चढ-उतारांवर भाष्य केलंय.
आयुष्यात आलेल्या किंवा बिझनेसमध्ये आलेल्या मोठ्या संकटांनंतरही पुन्हा नव्यानं उभं राहण्याची क्षमता कशी निर्माण होते, हे सांगताना त्यां त्याचा बिझनेस पार्टनर अंकुर अग्रवाल यांच्या जिद्दीचं उदाहरण दिलं आहे.
१०० कोटींचे नुकसान ‘बीएनडब्ल्यू डेव्हलपमेंट्स’ मधील आपले व्यावसायिक भागीदार अंकुर अग्रवाल यांच्याबद्दल बोलताना विवेकनं सांगितलं की, एका काळात त्यांना १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागलं होतं. एवढं मोठं नुकसान सोसल्यानंतरही अंकुर यांनी कधीही हार मानली नाही.
‘चला, एकत्र मिळून पुन्हा काहीतरी नवीन उभारूया,’ असा विश्वास त्यांनी दाखवला. त्यांच्यात सुरुवातीपासूनच एका खऱ्या नेतृत्वाचे गुण होते,” अशा शब्दांत विवेकनं त्यांचं कौतुक केलं.
सांगितला ‘बॉस’ अन् ‘लीडर’मधील फरक विवेकच्या मते, खरं नेतृत्व तेच असतं जे आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन पुढं जातं. बॉस फक्त काम करून घेतो, तर एक लीडर सहकाऱ्यांना प्रवासातील भागीदार मानतो, असं मत विवेकनं मांडलं.
अलिकडच्या आर्थिक मंदीच्या काळात अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली; मात्र विवेक आणि त्यांच्या पार्टनरनं एकाही कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून न टाकण्याचा निर्णय घेतला. कठीण काळाचा फटका फक्त मालकाला नाही, तर प्रत्येकाला बसतो. कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हेच खरं नेतृत्व आहे, असंही तो म्हणाला.
तसंच विवेकनं त्याच्या आईने दिलेल्या एका महत्त्वाच्या शिकवणीचा उल्लेख केला. सुरुवातीच्या काळात मिळालेल्या यशाबद्दल आईनं विचारलं होतं, “जेव्हा तुला कमी वयात यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळाली, तेव्हा तू कधी ‘मीच का?’ असा प्रश्न विचारला नव्हतास ना? मग संकटाच्या वेळी असा प्रश्न का?” या एका प्रश्नानं विवेकचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला.
दरम्यान, विवेकच्या बॉलिवूडमधील कामाबद्दल बोलायचं झालं तर तो नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायणम् सिनेमात दिसणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या ट्रेलरमध्ये त्याच्या अवघ्या दोन सेकंदांच्या सीननं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटात तो ‘विद्युतजिह्वा’ या पात्राची भूमिका साकारत आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा