Headlines

Sonali Bendre turns presenter with Marathi film sohala


Sonali Bendre turns presenter with Marathi film sohala:९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे.

Sonali Bendre
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई टाईम्स टीम

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता मराठी चित्रपटविश्वाशी नव्या नात्यानं जोडली जात आहे. ‘सोहळा’ या सिनेमामधून ती प्रस्तुतीकर्ती म्हणून समोर येतेय.
या सिनेमातून आशा, जिद्द आणि संवेदनशील कथानक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

प्रस्तुतकर्ती म्हणून पहिल्याच मराठी सिनेमाविषयी सोनाली म्हणाली, ‘सोहळा‘ हा सिनेमा प्रस्तुत करणं माझ्यासाठी खूप खास आहे; कारण याच चित्रपटातून माझ्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात होत आहे. मला नेहमी अशाच कथा आवडतात ज्या चित्रपट संपल्यानंतरही मनात कायम राहतात, ज्या विचार करायला भाग पाडतात आणि आयुष्याकडे नव्या दृष्टीनं पाहायला शिकवतात. ‘सोहळा’नं मला नेमकं हेच दिलं.

पहिल्यांदा ही कथा ऐकली, तेव्हाच तिच्याशी माझं एक वेगळंच नातं जुळलं. या कथेच्या केंद्रस्थानी आहे आशा, जिद्द आणि सामान्य माणसांमध्ये दडलेलं शांत सामर्थ्य. गेल्या काही वर्षांत हीच मूल्यं माझ्यासाठी अधिक महत्त्वाची ठरली आहेत आणि म्हणूनच या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी ‘सोहळा’पेक्षा योग्य कथा दुसरी असूच शकत नव्हती.’ साईकत बागबान यानं सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन केलं असून; सिनेमात प्रमुख भूमिकेत कोण कोण कलाकार आहेत ? हे सध्या गुलगस्त्यात आहे.

Maharashtra TimesPriyanka Chatuvedi: आता समजलं की ‘रामायणम्’चा प्रोमो इतका वेळ लपवून का ठेवला, प्रियंका चतुर्वेदींची ट्रेलरवर प्रतिक्रिया चर्चेत
तसंच दिग्दर्शक साईकत बागबान यांनी आनंद व्यक्त करताना म्हटलं की, चित्रपटाची कथा जेवढी प्रामाणिक आहे, तितकाच विश्वास सोनाली बेंद्रे आणि रोज मुव्हीजने त्यावर दाखवला आहे. यामुळं चित्रपटाला एक मोठं बळ मिळालं आहे.

केव्हा प्रदर्शित होणार सिनेमा?
कलाकारांची नावं समोर आली नसली तरी हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान, सोनालीच्या इतर कामाबद्दल बोलायचं झालं तर ती नुकतीच ‘ अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘राख’ या क्राइम-थ्रिलर वेब सीरिजमध्ये एका महत्त्वपूर्ण आणि वेगळ्या भूमिकेत दिसून आली. तसंच द ब्रोकन न्यूज’ सोनालीने झी५ वरील ‘द ब्रोकन न्यूज’ या लोकप्रिय वेब सीरिजमधून ओटीटी विश्वात दमदार पदार्पण केलं होतं. यामध्ये तिने ‘अमिना कुरेशी’ या पत्रकाराची साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली.

Maharashtra TimesRenuka Shahane: हृताची हीच जिद्द आणि तिचं समर्पण तिला वेगळं ठरवतं, रेणुका शहाणेंनी केलं ऑनस्क्रीन लेकीचं कौतुक
अभिनयासोबतच सोनाली टीव्हीवरील विविध रिॲलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही सातत्याने काम करत आहे. यासोबतच ५१ व्या वर्षी तिचं फिटनेस रुटीन आणि ‘ओमॅड’ डाएट प्लॅन यामुळेही ती सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा