Headlines

CSMT Goregaon Harbour line Mumbai Local to remain closed for 45 days Western Railway 6th lane Bandra gets new Platform; CSMT-गोरेगाव हार्बर लोकल दीड महिने बंद राहण्याचे संकेत, पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेचं काम, वांद्य्रात नवा फलाट


Mumbai Local : मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गाच्या उभारणीसाठी हार्बर रेल्वेवरील गोरेगावपर्यंतची लोकल सेवा सुमारे ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.

CSMT Bandra Harbor Local Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गाच्या उभारणीसाठी वांद्रे-खार उड्डाणपुलाची पुनर्बांधणी अत्यावश्यक आहे. या कामासाठी हार्बर गोरेगावपर्यंतची लोकल सेवा सुमारे ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. या प्रकल्पादरम्यान वांद्रे स्थानकात एक नवा फलाट उभारण्यात येणार आहे.

मुंबई सेंट्रल-बोरीवलीमध्ये सहावी मार्गिका

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-२ प्रकल्पांतर्गत मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान ३० किलोमीटरची सहावी मार्गिका उभारण्यात येत आहे. सद्यस्थितीत खार ते बोरिवलीदरम्यान ही मार्गिका सुरू आहे. मुंबई सेंट्रल ते खारदरम्यान मार्गिका उभारण्याचे काम सुरू आहे. वांद्रे-खार उड्डाणपूल पाडून त्याची पुनर्बांधणी करणे हे प्रकल्पातील सर्वांत महत्त्वाचे आव्हान आहे.

४५ दिवस सीएसएमटी-गोरेगाव लोकल बंद

‘प्रीकास्ट सेगमेंटल’ बांधकामासारख्या आधुनिक आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून पुलाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यामुळे ४५ दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, या काळात हार्बर लोकल सीएसएमटीहून केवळ वांद्रेपर्यंत धावणार आहे. ४५ दिवस सीएसएमटी-गोरेगाव लोकल बंद ठेवण्याबाबत चाचपणी सुरू आहे. मात्र, याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही, असे रेल्वेतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
Maharashtra TimesAjinkya Rahane : 7 वर्षांचा अजिंक्य रहाणे डोंबिवली लोकलच्या गर्दीतून एकटा प्रॅक्टिसला जायचा, बाबांची ट्रिक, सहा वर्षांनी कारण समजताच गहिवरला

वांद्रे स्थानकात नवा फलाट

वांद्रे स्थानकातील प्रस्तावित नव्या फलाटावरून अधिक लोकल फेऱ्या चालवणे शक्य होणार आहे. या सहाव्या मार्गाच्या उभारणीची प्रमुख निविदा प्रक्रिया ऑगस्ट २०२६पासून टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे.

Farm Loan Waiver Problems: यादीत नाव नाही, रक्कम कमी, Farmer ID Issues, मयत शेतकऱ्यांना लाभ कसा?

ठाणे स्थानकातील खाद्यपदार्थांवर उंदीर

दरम्यान, ठाणे रेल्वे स्थानकातील एका स्टॉलमधील खाद्यपदार्थांवर उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ बुधवारी रात्री समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली. संबंधित स्टॉल सात दिवसांसाठी सील करण्यात आला. कंत्राटदाराला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या कारवाईनंतर सर्व रेल्वे स्थानकांवरील स्टॉलची तपासणी करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
Maharashtra TimesE20 Fuel in India : ई20 पेट्रोल वाहनांसाठी सुरक्षित, राज्यमंत्र्यांचे लोकसभेत उत्तर, वाहन बंद पडण्याचे व्यापक पुरावे नाहीत
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर प्रतीक्षालय आहे. या प्रतीक्षालयात बहुउद्देशीय स्टॉल आहे. यामधील टोमॅटोवर उंदीर फिरत असल्याचे दिसले. एका प्रवाशाने ही घटना मोबाइल फोनमध्ये टिपली. व्हिडीओ व्हायरल झाला. त्याची दखल घेत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील वाणिज्य कार्यालयाने खातरजमा केली. त्यानंतर स्टॉलधारकाविरुद्ध कारवाई करत स्टॉल सात दिवसांसाठी सील केला. कंत्राटदाराला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.