Munmun Dutta On Discrimination Against female Artist: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेनं नुकतीच १८ वर्षे पूर्ण केली. या मालिकेतील एक महत्त्वाचं पात्र म्हणजे ‘बबीता’. अभिनेत्री मुनमुन दत्तानं ही भूमिका साकारली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
टमुंबई: सिनेइंडस्ट्री असो किंवा मग टीव्ही इंडस्ट्री …इथे महिला कलाकारांना मिळणारं मानधन आणि दिली जाणारी वागणूक याबद्दल अनेकदा चर्चा होते. पुरुष कलाकरांना दिलं जाणारं महत्त्व, महिलांना डावललं जाणं, या सगळ्याबद्दल ‘तारक मेहता’ फेम मुनमुन दत्ता व्यक्त झाली आहे.
टेलिव्हिजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ मधील ‘बबीता जी’ हे पात्र घराघरांत पोहोचवणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. मनोरंजन क्षेत्रात आणि शोमध्ये महिला कलाकारांचे योगदान तितकंच महत्त्वाचं असतानाही त्यांना योग्य ते श्रेय किंवा सन्मान मिळत नाही, असं सांगत तिनं या भेदभावावर थेट भाष्य केलं आहे.
Priyanka Chatuvedi: आता समजलं की ‘रामायणम्’चा प्रोमो इतका वेळ लपवून का ठेवला, प्रियंका चतुर्वेदींची ट्रेलरवर प्रतिक्रिया चर्चेत महिला कलाकारांच्या योगदानाकडे दुर्लक्ष ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेनं नुकतीच आपल्या प्रवासाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत. या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुनमुन दत्तानं तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ती म्हणाली की, शोच्या यशात महिला कलाकारांचा वाटाही तेवढाच मोठा आणि मोलाचा आहे. मात्र, कित्येकदा महिलांना तितकं महत्त्व किंवा श्रेय दिलं जात नाही, जे मिळायला हवं. त्या शोमध्ये आणि स्वतःच्या पात्रांमध्ये मोलाचं योगदान देत असतात.
मुनमुननं स्पष्ट केले की ती नेहमीच महिलांच्या पाठिशी उभी राहणारी व्यक्ती आहे. मी एक फेमिनिस्ट (स्त्रीवादी) आहे. जर आपल्याला पुढं जायचे असेल, तर एकत्रच पुढं जावं लागेल. मला शोमधील इतर कोणत्याही महिला कलाकाराबद्दल कधीही असुरक्षितता वाटली नाही. आम्ही सर्व महिला कलाकार अत्यंत मोकळेपणानं आणि प्रोफेशनल पद्धतीनं काम करतो.
१८ वर्षांचा यशस्वी प्रवास ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोने २८ जुलै रोजी आपल्या यशस्वी प्रवासाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत. जवळपास दोन दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या शोमध्ये जुने आणि नवे कलाकार एकत्र येऊन उत्तम काम करत आहेत. मुनमुन दत्ताच्या या वक्तव्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीत महिलांना मिळणाऱ्या वागणुकीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा