नाशिक शहरातील रस्त्यांची चाळण आणि खड्ड्यांवरून मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय. खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला असून, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे जीव गेल्याचा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. नाशिकमध्ये इतकी वाईट परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती असं म्हणत भुजबळ संतापले. या प्रकरणी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि संबंधित यंत्रणांनी यामध्ये लक्ष घालावं असा सल्ला त्यांनी दिला.