Headlines

Local Body Election: राज्यात पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजणार! प्रलंबित जिल्हा परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान


अनुराग कांबळे, मुंबई : महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा खाली बसून काही महिने होत नाहीत, तोच पुन्हा एकदा राज्यात निवडणुका होणार आहेत. राज्यातील १२ हजारांच्या आसपास ग्रामपंचायती, ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि मुदत संपलेल्या १०५ नगर पंचायती यांच्या निवडणुका वर्षअखेरीस किंवा जानेवारी, २०२७मध्ये घेण्यात येणार आहेत.

राज्यात मतदारयाद्यांची विशेष सखोल पडताळणी मोहीम (एसआयआर) सुरू असून त्याची अंतिम मुदत ऑक्टोबर आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून या निवडणुका घेण्यास हिरवा कंदील मिळाला, तरी प्रत्यक्षात निवडणुका होण्यास वर्षअखेर किंवा नववर्ष उजाडण्याची दाट शक्यता आहे.

Maharashtra TimesAditya Thackeray: गाडी-बंगल्याची मागणी, आदित्य ठाकरेंनी भाजप-शिंदेंना कोंडीत पकडलं; मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी
ओबीसी आरक्षणामुळे काही जिल्ह्यांमध्ये एकूण आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या ठिकाणी निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. नुकत्याच झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान, उर्वरित निवडणुका ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घेणे शक्य आहे का, याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, असे निर्देश दिले होते.

राज्यात एसआयआरचे काम युद्धपातळीवर सुरू असून नुकतीच भारत निवडणूक आयोगाने त्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार अंतिम मतदारयाद्या जाहीर करण्याची मुदत १९ ऑक्टोबर आहे. त्यामुळे राज्यातील निवडणूक अधिकारी आणि बीएलओ त्यात व्यग्र आहेत. या परिस्थितीत निवडणुका घेणे शक्य नाही. तसेच, जवळपास १०५ नगर पंचायती आणि १२ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरअखेर, तसेच जानेवारी २०२७मध्ये पूर्ण होत आहे.

त्यामुळे, या सर्व गोष्टींचा विचार करता, या निवडणुका डिसेंबरअखेरीस किंवा जानेवारी, २०२७मध्ये घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केल्याचे कळते.

Maharashtra TimesDevendra Fadnavis : देशातील 31 CM ची संपत्ती जाहीर, DK शिवकुमार 1413 कोटींचे धनी, फडणवीसांचा शेती व्यवसाय, मालमत्ता 13 कोटी
प्रलंबित निवडणुका
जिल्हा परिषदा : २०
पंचायत समित्याः २११
नगर पंचायती : १०५
ग्रामपंचायती: सुमारे १२ हजार

सध्या राज्यभर ‘एसआयआर’ मोहीम सुरू असून त्याच्या मध्यातच निवडणुका घेणे संयुक्तिक राहणार नाही. मतदारयाद्या अद्ययावत झाल्यावर त्याचाच आधार घेत या निवडणुका घेता येतील. त्यामुळेच ही संपल्यानंतर निवडणुका होण्याची शक्यता आहे. – निवडणूक आयोगातील अधिकारी

अनुराग कांबळे

लेखकाबद्दलअनुराग कांबळेगेली १५ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. लोकसत्ता आणि मिड-डे या वृत्तपत्रांमध्ये काम. दीड दशकात शिक्षण, आरोग्य, गुन्हेविश्व यात पत्रकारिता करण्याचा अनुभव महाराष्ट्र टाइम्समधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये कॉपी राइटर म्हणून काम केले होते. आता महाराष्ट्र टाइम्समध्ये राजकीय पत्रकार म्हणून कार्यरत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत