Headlines

Uddhav Thackeray slams BJP compares Afzal Khan statement with CJI; शिवरायांनाही अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटलेले, युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये काय फरक? ठाकरेंचा घणाघात


Maharashtra Politics : युवकांना ‘झुरळ’ अशी उपमा दिल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटले होते. आज युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये आणि त्यांच्यात काय फरक आहे,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Uddhav Thackeray Maharashtra Times (5)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ‘आज देशात युवा शक्तीपेक्षा बुवाशक्ती माजली आहे. देशाचे भविष्य युवक आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून देश पुढे जाऊ शकत नाही. लोकशाही संपली असे वाटत होते; पण युवकांनी सिद्ध केले की लोकशाही संपलेली नाही, ती नव्या जोमाने उभी राहत आहे,’ असे कौतुकोद्गार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. युवकांना ‘झुरळ’ म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर टीका करत, युवक पेटले तर त्याला जबाबदार सरकारच असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

‘शिवरायांनाही अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटलेले’

‘जेव्हा न्याय मागूनही मिळत नाही, तेव्हा युवकांच्या हातात दगड येतो. त्यांना दहशतवादी म्हणण्यापूर्वी सरकारने आत्मपरीक्षण करावे. युवकांना ‘झुरळ’ अशी उपमा दिल्याचा उल्लेख करत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटले होते. आज युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये आणि त्यात काय फरक आहे,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Maharashtra TimesCrime News : मेकॅनिक प्रियकराने बँक कर्मचारी प्रेयसीचा जीव घेतला, किचनमध्ये बॉडी टाकून अपघात भासवला, एका क्लूने पुरता अडकला
‘आज जनतेचा राजकीय पक्षांवरील विश्वास उडाला आहे. नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर’, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी विविध पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा संदर्भ देत भाजपला उपरोधिक टोला लगावला.

Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीत कर्ज आणि यादीचा घोळ, ‘हेअरकट’ प्रकरण काय?

वापरा आणि फेका भाजपचे धोरण

‘भाजपने राजकारणात ‘वापरा आणि फेकून द्या’ हे धोरण अवलंबले आहे. सत्तेवर येण्यासाठी त्यांनी शिवसेनेचा वापर केला आणि त्यानंतर तिला वाऱ्यावर सोडले. भाजपने सत्ता मिळवण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या नावाचा वापर केला; मात्र सत्तेवर आल्यानंतर त्यांनी त्यांनाही बाजूला सारले असून, आता ते अयोध्येतील राम मंदिराच्या माध्यमातून लूट करण्यात मग्न आहेत.’ अशी टीकाही ठाकरेंनी केली.
Maharashtra TimesVaranasi Crime : मंदिरात लग्न, आमचे नवरा-बायकोसारखे संबंध होते; समलिंगी नात्यातून 26 वर्षीय तरुणाने जीव गमावला

पुस्तक प्रकाशनावेळी ठाकरेंचे ‘फटकारे’

शिवसेना उबाठाचे प्रवक्ते, जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांच्या ‘मार्मिक प्रकाशनाचे शतक’ आणि ‘मर्मभेद’ या दोन पुस्तकांचे आणि व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी संपादन केलेल्या ‘ज्वलंत रेषा बाळ केशव ठाकरे’ या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडले. मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.