Headlines

Iran Attacks Chinese Firm: इराणचं चाललंय काय? मित्रदेश चीनलाच धक्का, कंपनीवर क्षेपणास्त्रं डागली; जग आश्चर्यचकित


Iran Attacks Chinese Firm: गेल्या सहा महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष सुरू आहे. या युद्धात इराणला चीननं वेळोवेळी मदत केलेली आहे. त्याच इराणनं आता चिनी कंपनीवर क्षेपणास्त्र हल्ला चढवला आहे.

iran attack china
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
तेहरान: इराणनं आपल्याच आंतरराष्ट्रीय मित्राच्या संस्थेवर हल्ला केला आहे. हा हल्ला कुवेतमध्ये झाला. गुरुवारी सकाळी इराणनं केलेल्या हल्ल्यात उत्तर कुवेतमधील एका चिनी कंपनीच्या इमारतीला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती कुवेतच्या सैन्यानं दिली. इराणच्या हल्ल्यात इमारतीचं प्रचंड नुकसान झालं असून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना जॉर्डनच्या हवाई सुरक्षा यंत्रणेनं इराणनं डागलेली पाच क्षेपणास्त्रं पाडण्यात आल्यानंतर काही तासांनी घडली.

इराणच्या विरोधात हल्ल्यांचा एक मोठा टप्पा पूर्ण करण्यात आल्याची माहिती अमेरिकन सैन्यानं दिल्यानंतर इराणनं कुवेतमधील चिनी कंपनीच्या इमारतीला लक्ष्य केलं. जॉर्डनमध्ये असलेल्या अमेरिकेच्या तळांवर इराणनं हल्ले चढवण्यात आले. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनं इराणवर क्षेपणास्त्रं डागली. या हल्ल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली. ‘अमेरिकेनं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या डझनभर ठिकाणांवर हल्ले केले आहेत. यात मिलिट्री कमांड सेंटर, मिसाईल आणि ड्रोन फॅसिलिटी आणि किनारी भागातील टेहळणीसाठी वापरल्या जाणाऱ्या केंद्रांचा समावेश होता,’ अशी माहिती अमेरिकेकडून देण्यात आली.
Maharashtra TimesCrime News: थायलंडमध्ये 3 भारतीय पर्यटकांचं अपहरण; 5 भारतीयांना अटक, पाकिस्तानी सूत्रधार फरार; स्वस्त पॅकेज महागात
इराण विरुद्ध अमेरिका संघर्ष पेटलेला असताना चीन आणि इराण यांचे उत्तम संबंध पाहायला मिळालेले आहेत. अशा स्थितीत कुवेतमधील चिनी संस्थेवर इराणनं केलेल्या हल्ल्यानं दोन्ही देशांमधील संबंध ताणले जाऊ शकतात. इराणनं चिनी कंपनीच्या इमारतीवर हल्ला केल्यानं जगभरात आश्चर्य व्यक्त होत आहे. अमेरिका-इराण संघर्षात चीन इराणच्या बाजूनं उभा राहिला आहे. चीननं अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांचा निषेध केला असून इराणच्या सार्वभौमत्वाचं समर्थन केलं आहे. युद्ध संपवण्यासाठी आग्रही भूमिका घेत शस्त्रसंधीचं आवाहन केलं आहे.
Maharashtra TimesCrime News: हिरे व्यापाऱ्याचं मालीत अपहरण; कुटुंबानं खंडणीपायी 44 कोटी मोजले; 100 कोटींचा विषय सोडवला
चीननं अमेरिका-इराण युद्धात शांततेचं आवाहन करत आखाती देशांसोबत संबंध राखले आहेत. युद्ध काळात अमेरिकेला धक्का देण्यासाठी चीननं इराणला बरीच मदत केली आहे. चीन पुढच्या काही आठवड्यांमध्ये खांद्यावरुन डागली जाणारी क्षेपणास्त्रं इराणला देणार आहे. शोल्डर फायर्ड एअर डिफेन्स मिसाईल लॉन्चरमुळे इराणचं बळ वाढणार आहे. पण आता इराणनं कुवेतमधील चिनी कंपनीवर हल्ला केल्याची बातमी आली आहे.