Aditya thackeray strong criticism on mayor deputy mayors car bungalow demand; गाडी-बंगल्याची मागणी, आदित्य ठाकरेंनी भाजप-शिंदेंना कोंडीत पकडलं; मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी
Aditya thackeray strong criticism on mayor deputy mayors car bungalow demand; गाडी-बंगल्याची मागणी, आदित्य ठाकरेंनी भाजप-शिंदेंना कोंडीत पकडलं; मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी
मुंबई: मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मागील काही दिवसांपासून वादात सापडत आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सेवेसाठी जवळपास ३५ लाख रुपये किंमतीची इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड गाडी देण्यात आली असून उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच विविध समिती अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ एन वाहने देण्यात आली आहेत. परंतु सभागृह नेते गणेश खणकर यांनी स्कॉर्पिओ एन वाहन प्रवासासाठी सोयीचे नसल्याचं सांगत नव्या गाड्यांची मागणी केली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी उपमहापौर संजय घाडी यांनी दक्षिण मुंबईत बंगला मिळावा, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, “सत्तेत बसून ६ महिनेही झालेले नसताना यांचे नखरे सुरू झाले आहेत. या लोकांनी मुंबई महानगरपालिकेची तिजोरी गेल्या ४ वर्षात रिकामी केलीच असून आता भाजपाच्या महापौर आणि मिंधेंचे उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष नवीन गाडी – बंगला मागत आहेत. व्हीआयपी कल्चर तर एक, पण हे नखरे बघा. म्हणे लांबून यावं लागतं, खड्डे आहेत, ट्रॅफिक असते. लाखो मुंबईकर जी लोकल ट्रेन वापरतात, ती काही भाजपा १२ वर्षात सुधारु शकलेली नाही. मेट्रो यांना वापरायच्या नाहीत आणि आपली ‘बेस्ट’ यांना बंद पाडून खाजगी कंत्राटदारांच्या घशात घालायची आहे,” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “का हे सगळे नेते ‘बेस्ट’ बसने येत नाहीत? ट्रेन्स वापरत नाहीत? उपमहापौरांनी तर कळसच केला आहे. दक्षिण मुंबईत एक बंगला द्या अशी काही दिवसांपूर्वी यांची मागणी होती, असं कानावर आलं. मग तुमच्या टोळीच्या बॉसने ४ वर्षांपूर्वी सांगितलं होतं २ वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील, त्याचं काय झालं?” असा खरमरीत सवाल आदित्य यांनी विचारला आहे.
मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी केली?
महापौर-उपमहापौरांवर टीका करत असताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याना उद्देशून म्हटलं आहे की, “मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे…यांच्या नखऱ्यांसाठी मुंबईचा पैसा का वाया घालवला जात आहे? वापरू द्या की बेस्ट! मग बरोबर आमच्या काळात जशी परवडणारी बेस्ट सेवा होती आणि १०,००० पर्यंत बसेसची संख्या आम्ही वाढवत नेत होतो, तसं होईल,” असं त्यांनी म्हटलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा