Headlines

Satara Koyna Dam Shivsagar Jalsagar Renamed to Chhatrapati Shivaji Maharaj Koyna Jalsagar Mahrashtra Government Decision; ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’! साताऱ्यातील धरणाच्या जलाशयाला मिळाली नवी ओळख; सरकारचा मोठा निर्णय


Renaming Of Satara Koyna Shiv Jalsagar : शिवसागर असं नाव असलेल्या कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ या नावाने ओळखलं जाणार आहे.

Renaming Of Satara Koyna Shiv Jalsagar
छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आणि उद्योग विश्वाचा कणा मानल्या जाणाऱ्या कोयना जलाशयाच्या नामांतराचा राज्य सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आजपर्यंत ‘शिवसागर जलाशय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना जलाशयाला आता ‘ छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर ‘, अशी नवी ओळख मिळाली आहे.

कोयना धरण महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी

साताऱ्यातील निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं कोयना धरण हे महाराष्ट्राला वरदान ठरलं आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. तसेच पूर्वेकडील सिंचनाची आणि पिण्याच्या पाण्याची तहान भागवली जाते. कोयनेच्या पाण्यावर तयार होणारी वीज राज्याला प्रकाशमान करते. म्हणूनच कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटले जाते.
Maharashtra TimesSangli Crime : महावितरणच्या सबस्टेशनमध्ये दुचाकी चार्जिंग करण्यास विरोध, वॉचमनच्या मुलाच्या डोक्यात सणक गेली; ऑनड्युटी ऑपरेटरला संपवलं
कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’, असं नामांतर करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहसिक निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. जलशयाचे नामांतर करण्याबाबत विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. त्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यापुढे कोयना जलाशयाला ‘ छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर ‘, असं म्हणून ओळखलं जाईल.

यंदा पुराचं संकट नाही

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस, पाणीसाठ्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. धरण पूर्ण क्षमतेनं भरलं की राज्याच्या उद्योग विश्वाची काळजी मिटते. त्याचबरोबर सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येतो. सध्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे. धरणात 80 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाऊसकाळ शिल्लक असल्यानं सध्या धरणातून कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. व्यवस्थापनाच्या नियोजनामुळे यंदा पुराचं संकट निर्माण झालेले नाही.
Maharashtra TimesNCMC Card: एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’साठी प्रवाशांची कसरत, महामंडळाकडून नागरिकांना दिलासा; नोंदणीसाठी एका महिन्याची मुदतवाढ

छत्रपती शिवाजी महाराजांचा योग्य तो आदर

दरम्यान, कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जलप्रकल्पांपैकी एक असून, या निर्णयामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा योग्य तो आदर आणि सन्मान राखला गेला असल्याची भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. शासकीय कागदपत्रं आणि दैनंदिन व्यवहारात आता याच नव्या नावाचा अधिकृत वापर केला जाईल.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा