Headlines

जेन-झींच्या आंदोलनाने देशाची बदनामी केली!:बाबा रामदेवांच्या विधानावर प्रकाश आंबेडकरांचा पलटवार, म्हणाले- 'हा RSS-भाजपचा अजेंडा'




नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने उभारलेल्या 35 दिवसांच्या आक्रमक आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या यशस्वी आंदोलनाची देशभरात चर्चा असतानाच, योगगुरू बाबा रामदेव यांनी या आंदोलनावर आणि ‘जेन-झी’ पिढीवर सडकून टीका केली आहे. “जेन-झीच्या आंदोलनामुळे भारताची बदनामी झाली,” असा दावा त्यांनी केला आहे. रामदेव बाबांच्या या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून जोरदार पलटवार केला आहे. बाबा रामदेव नेमके काय म्हणाले? बाबा रामदेव म्हणाले, “जेन-झीने भारताला बदनाम केले आहे. शिव्यांची लाखोली वाहणे हा आपला नैसर्गिक भाव आणि संस्कृती नाही. आपण नेहमीच आई-वडील, गुरू आणि वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींचा आदर व सन्मान केला आहे.” ‘देश संसदेतून चालतो, रस्त्यावरून नाही’ “रस्त्यावर उतरून देश चालत नसतो, तर तो संसदेतून आणि संविधानाआधारे चालतो. देशाचा शिक्षणमंत्री कोण असावा किंवा नसावा, हे रस्त्यांवर ठरवता येणार नाही; तो निर्णय संसद आणि देशाचे पंतप्रधान घेतील,” अशी टीका त्यांनी केली. प्रकाश आंबेडकरांचे चोख प्रत्युत्तर: ‘हा आरएसएस-भाजपचा नवा अजेंडा’ बाबा रामदेव यांच्या या विधानावर प्रकाश आंबेडकर यांनी इंग्रजीतून एक सविस्तर ट्विट करत त्यांचा समाचार घेतला आहे. “तरुणांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाबाबत रामदेवांचे विधान अत्यंत मूर्खपणाचे (Absurd) आहे. परीक्षांमधील पेपरफुटीसारख्या गंभीर आणि रास्त समस्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांना ‘देशविरोधी’ ठरवून सरकारची जबाबदारी झटकण्याचा हा आरएसएस-भाजपचा नवा अजेंडा आहे.” फ्रान्सच्या लोकशाहीचे उदाहरण “फ्रान्ससारख्या देशात रस्त्यांवरील आंदोलने आणि संप हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आणि लोकशाहीच्या स्वास्थ्याचा महत्त्वाचा स्तंभ मानला जातो. तिथे पेन्शन सुधारणा किंवा महागाईविरोधातील आंदोलनांकडे राजकीय चर्चेचा भाग म्हणून पाहिले जाते, त्यांना ‘देशविरोधी’ ठरवले जात नाही.” हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न “हे आरएसएस-भाजपचे हस्तक देशाला हुकूमशाहीच्या (Authoritarianism) दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेचे रास्त प्रश्न दडपून आणि जबाबदारीपासून पळ काढून हे लोक स्वतःच देशविरोधी कृत्य करत आहेत,” असा घणाघात आंबेडकरांनी केला. RSS आणि भाजपच्या इतिहासावर बोट आंबेडकरांनी आपल्या ट्विटच्या शेवटी संघाच्या आणि भाजपच्या भूतकाळाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर पाच दशके राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःच्या मुख्यालयावर तिरंगा का फडकवला नाही? किंवा त्यांनी संविधानाला कसा विरोध केला होता? तसेच, 2000 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलण्याचा प्रयत्न कसा केला होता, याची मी आठवण करून देऊ का?” बाबा रामदेव यांच्या विधानामुळे आणि त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या आक्रमक उत्तरामुळे आता ‘जेन-झी’ आंदोलन आणि लोकशाहीतील आंदोलनांचा अधिकार यावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. धनुष्यबाण कुणाचा?: शिवसेना नाव आणि चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कोणाचे, या गेल्या तीन वर्षांपासून गाजत असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून आज न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. सकाळी 11 नंतर सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आजच्या सुनावणीत न्यायालय पुढील सुनावणीचा आराखडा ठरवते की युक्तिवादाला सुरुवात करते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत