तीन रो सीटिंग, व्ही 6 डिझेल इंजिनसह अन्य फिचर्स
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
ऑडीने आपली आतापर्यंतची सर्वात मोठी एसयूव्ही, क्यू 9 सादर केली आहे. 3-रो सीटिंग असलेली ही फुल-साईज एसयूव्ही क्यू7 आणि क्यू8च्या वर एक नवीन फ्लॅगशिप मॉडेल म्हणून सादर करण्यात आली आहे. यामध्ये जगातील पहिले वक्र डिजिटल ओल्ड रिअर लाइट्स, ऑटोमॅटिक पॉवर डोअर्स आणि कंपनीचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅनोरॅमिक सनरूफ आहे.
इंटिरियर आणि लक्झरी वैशिष्ट्यो
क्यू9 मध्ये स्टँडर्ड म्हणून सात सीट्स मिळतात, तर ग्राहक सहा-सीटरचा पर्याय देखील निवडू शकतात. यामध्ये दुसऱ्या रांगेत इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल कॅप्टन सीट्स आहेत. पुढच्या सीट्समध्ये हीटेड, व्हेंटिलेटेड आणि मसाज यांसारखी वैशिष्ट्यो आहेत.
3-इंचाचा डिस्प्ले, एआय असिस्टंट आणि एआयआर साउंड सिस्टीम यात 11.9-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 14.5-इंचाचा वक्र टचक्रीन आणि प्रवाशांसाठी डायनॅमिक प्रायव्हसी मोडसह 12.3-इंचाचा डिस्प्ले मिळतो. ही सिस्टीम अँड्रॉइड ऑटोमोटिव्ह ओएसवर चालते, आणि ऑडी अॅप स्टोअरचा अॅक्सेस देते.
