Headlines

सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:आता बंडखोरांकडेही आहे‎ देशांसारखी लष्करी ताकद‎




‎‎‎‎‎‎‎‎पश्चिम आशियाच्या संदर्भात हुती बंडखोर क्वचितच‎चर्चेचा विषय बनतात. ते तेव्हाच प्रकाशझोतात येतात,‎जेव्हा इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली जातात, लाल समुद्रात‎व्यापारी जहाजांवर हल्ले होतात किंवा येमेनमधील त्यांच्या‎अड्ड्यांवर बॉम्बफेक होते. त्यांना केवळ इराणचा हस्तक‎समजले जाते. पण हे विश्लेषण त्यांची रणनीतिक‎महत्त्वाची बाजू स्पष्ट करण्यात अपुरे पडते. हुती आता‎एका स्थानिक बंडखोर संघटनेतून बदलून जगातील सर्वात‎प्रभावी नॉन-स्टेट लष्करी संघटना बनले आहेत. त्यांनी‎मोठ्या नौदल शक्तींना आव्हान देण्याची, अत्यंत व्यस्त‎सागरी मार्गांपैकी एक मार्ग बंद पाडण्याची आणि लांब ‎‎अंतरापर्यंत आपली लष्करी ताकद दाखवून देण्याची क्षमता ‎‎सिद्ध केली आहे, जी पूर्वी केवळ सार्वभौम देशांकडेच ‎‎असायची. आधुनिक युद्धाचे बदलते स्वरूप समजून ‎‎घेण्यासाठी आता हुतींना समजून घेणेही गरजेचे बनले‎आहे. हुती संघटना 1990 च्या दशकात उत्तर येमेनमध्ये एक ‎‎सामाजिक-धार्मिक चळवळ म्हणून उदयाला आली होती. ‎‎येमेनमधील दीर्घकाळ चाललेल्या अस्थिरतेने तिला एक ‎‎शक्तिशाली सशस्त्र संघटना बनवले. 2014 मध्ये राजधानी ‎‎सनावर त्यांनी ताबा मिळवल्यानंतर तिथे यादवी युद्ध सुरू ‎‎झाले, ज्यामध्ये सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती‎(यूएई) आणि अप्रत्यक्षपणे इराणही सहभागी झाला होता.‎आज उत्तर येमेनमधील मोठ्या भागावर हुतींचे नियंत्रण‎आहे. ते एखाद्या बंडखोर संघटनेसारखे कमी आणि एका‎शासक प्रशासनासारखे अधिक कार्य करतात.‎ यात शंका नाही की, हुतींना क्षेपणास्त्र आणि ड्रोन तंत्रज्ञान,‎प्रशिक्षण, गुप्तचर यंत्रणा व राजकीय साहाय्य देऊन त्यांची‎लष्करी ताकद वाढवण्यात इराणची भूमिका निर्णायक‎ठरली आहे. तरीही या दोघांच्या नात्याला थेट नियंत्रणापेक्षा‎एक रणनीतिक भागीदारी म्हणून अधिक चांगल्या प्रकारे‎समजता येऊ शकते. हुती सातत्याने अशा उद्देशांसाठी‎लढत आहेत, जे इराणच्या प्रादेशिक हितांशी जुळणारे‎आहेत, पण याचा अर्थ ते थेट तेहरानच्या हुकमानुसारच‎सर्व करतात असे नाही. हुतींचे महत्त्व केवळ त्यांच्या‎विचारसरणीतच दडलेले नाही, तर त्यांच्या भौगोलिक‎स्थानामध्येही आहे. त्यांचे वर्चस्व बाब-अल-मंदेब‎सामुद्रधुनीवर आहे, जो लाल समुद्राला एडनचे आखात‎आणि हिंद महासागराशी जोडणारा एक बिकट संकटाचा‎व निमुळता सागरी मार्ग आहे. सुएझ कालव्याचा वापर‎करणारी सर्व जहाजे याच मार्गावरून जातात. अशा‎परिस्थितीत हुतींना पाठिंबा देऊन इराणने स्वतः नौदल‎उभारणीवर कोणताही खर्च न करता जगातील सर्वात‎महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एकावर आपला अप्रत्यक्ष‎प्रभाव कायम ठेवला आहे. हुतींची अत्याधुनिक लष्करी‎ताकद त्यांना इतर बंडखोर संघटनांपेक्षा वेगळी ठरवते.‎याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी वारंवार या शस्त्रास्त्रांचा‎प्रभावी वापर करून दाखवला आहे. व्यापारी जहाजांवर‎त्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे अनेक जहाजांना आपला मार्ग‎बदलून केप ऑफ गुड होपवरून वळून जावे लागते. यामुळे‎मालवाहतुकीचा खर्च, विमा प्रीमियम आणि जागतिक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पुरवठा साखळीत माल पोहोचण्याचा कालावधी वाढला‎आहे. कोणतीही अधिकृत नौदल वा हवाई दल नसताना‎फारच कमी नॉन-स्टेट संघटना असा दूरगामी प्रभाव पाडू‎शकल्या आहेत. भारतासाठी हुतींचा हा अनुभव एक‎मोलाचा रणनीतिक धडा देतो. भारताने आपल्या‎सातत्यपूर्ण राजकीय, लष्करी आणि गुप्तचर प्रयत्नांच्या‎बळावर सीमाभागातील असे धोके बऱ्याच अंशी निष्प्रभ‎केले आहेत. तरीही बदलत चाललेले भूराजकारण निष्क्रिय‎पडलेल्या नेटवर्कना पुन्हा जागे करू शकते. बाहेरील‎मदतीमुळे त्यांची युद्धक्षमता झपाट्याने वाढू शकते. हुती‎आपल्याला याचीच आठवण करून देतात की‎भविष्यातील सुरक्षा आव्हाने अशा नॉन-स्टेट‎संघटनांकडूनही उभी ठाकू शकतात, ज्या सीमा आणि‎पारंपारिक युद्धभूमीच्या पलीकडे जाऊन सक्रिय असतात.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ केवळ लष्करी कारवाईने हुतींचा बीमोड‎करता येत नाही. वर्षानुवर्षे चाललेल्या‎सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील लष्करी‎मोहिमा आणि नंतर अमेरिका-ब्रिटनच्या‎हल्ल्यांनी त्यांच्या लष्करी क्षमतेला धक्का‎दिला खरा, पण त्यांना युद्धाचा अधिक‎अनुभवही मिळवून दिला.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत