Headlines

Suneil Anand : देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंदचं निधन, वयाच्या 70 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप


Suneil Anand Death : देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंद यांचं वयाच्या ७०व्या वर्षी निधन झालं आहे.

Suneil Anand Passes Away At Age Of 70
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंद यांचं वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी एका अधिकृत निवेदनातून या बातमीला दुजोरा दिला आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘जड अंतःकरणानं, आमचं कुटुंब सुनील आनंद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे. या कठीण काळात आम्हाला मिळालेल्या प्रेम, प्रार्थनेबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा.’
Maharashtra TimesSalman Khan : आसाममधील पूरग्रस्तांना सलमान खानचा मदतीचा हात, अभिनेत्याकडून अन्न आणि सॅनिटरी पॅड्सचं वाटप
NDTV च्या रिपोर्टनुसार, हे निवेदन त्यांची भाची, झीना नारंग यांनी जारी केलं आहे. पण, कुटुंबीयांनी अद्याप त्यांच्या मृत्यूचं कारण किंवा अंत्यविधीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

‘आनंद और आनंद’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

सुनील आनंद यांनी वॉशिंग्टन डी.सी. येथील अमेरिकन युनिव्हर्सिटीमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर, त्यांनी वडील देव आनंद यांच्याप्रमाणे चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सुनील आनंद यांनी १९८४ मध्ये त्यांचे वडील देव आनंद दिग्दर्शित ‘आनंद और आनंद’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी ‘कार थीफ’ आणि ‘मैं तेरे लिए’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, त्यांना त्यांच्या वडिलांसारखं यश मिळवता आलं नाही. अभिनयात अपेक्षित ओळख मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर, त्यांनी कॅमेऱ्यामागे काम करण्यास सुरुवात केली आणि आपल्या कुटुंबाच्या ‘नवकेतन फिल्म्स’ या बॅनरची जबाबदारी स्वीकारली. २०१२ मध्ये, सुनील यांनी ‘वागाटोर मिक्सर’ या आपल्या हॉलिवूड प्रोजेक्टची घोषणा केली. हा चित्रपट गोव्यातील ड्रग्ज रॅकेटसारख्या समस्यांवर आधारित होता.
Maharashtra TimesRaja Chaudhary : ‘लग्नानंतरही एका अभिनेत्यासोबत तिचं अफेअर होतं’, श्वेता तिवारीबद्दल एक्स पती राजा चौधरीचा धक्कादायक दावा

देव आनंद यांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न

‘नवकेतन फिल्म्स’च्या माध्यमातून त्यांनी आपल्या वडिलांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनाच्या बातमीनं चित्रपटसृष्टी आणि देव आनंद यांच्या चाहत्यांमध्ये दुःखाची लाट पसरली आहे. चाहते सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त करत आहेत.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा