Headlines

अमेरिकन दूतावासाबाहेर कॅनडामध्ये गोळीबार


► वृत्तसंस्था टोरोंटो
कॅनडातील टोरोंटो येथील अमेरिकी दूतावासाबाहेर मंगळवारी गोळीबार झाला. सुदैवाने, या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, गोळ्यांमुळे दूतावासाच्या इमारतीच्या बाह्य भागाचे नुकसान झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक रिकामी काडतूस जप्त केली. गोळीबारानंतर लगेचच एक पांढरी सेडान गाडी घटनास्थळावरून वेगाने निघून जाताना दिसली.

पोलिसांनी हल्लेखोरांचा पाठलाग केला, परंतु गाडीचा प्रचंड वेग आणि सार्वजनिक सुरक्षेच्या चिंतेमुळे पाठलाग थांबवण्यात आला. याप्रकरणी तातडीने कोणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी संशयितांचा शोध सुरू आहे.

अमेरिकी परराष्ट्र विभाग या घटनेसंदर्भात कॅनेडियन एजन्सींच्या संपर्कात आहेत. या हल्ल्यामागील सूत्रधारांना पकडून त्यांना त्वरित शिक्षा केली जाईल, असे ओंटारियोचे प्रीमियर डग फोर्ड यांनी सांगितले. यापूर्वी 10 मार्च रोजी याच अमेरिकी दूतावासावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. 28 जुलै रोजी झालेला गोळीबार ही चालू वर्षातील दुसरी घटना आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत