Headlines

Prajakta Kulkarni : रील्स स्टार्सना सेटवर धड वाक्य बोलता येत नाही! प्राजक्ता कुलकर्णी यांची खंत; म्हणाल्या, ‘फॉलोअर्स बघून कामं मिळतात’


Prajakta Kulkarni : आजकाल कलाकारांना मालिका किंवा सिनेमामध्ये फॉलोअर्सबघून घेतलं जातं. यावर ‘ठरलं तर मग’ फेम प्राजक्ता दिघे यांनी खंत व्यक्त केली आहे.

Prajakta Kulkarni On Social Media Influencers
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – आजकाल कलाकारांना सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून मालिका किंवा सिनेमामध्ये कास्ट केलं जातं. अनेक रील स्टार मालिका आणि सिनेमांमध्ये झळकतायत. याबद्दल अनेक कलाकारांनी खंतही व्यक्त केली आहे. अशातच आता यावर ‘ ठरलं तर मग ‘ फेम प्राजक्ता दिघे यांनी भाष्य केलं आहे.

प्राजक्ता दिघे यांचं वक्तव्य

मराठी अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी आजवर अनेक गाजलेल्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. पूर्वी इतर प्रोजेक्टमधील कामं बघून दुसऱ्या सिनेमात किंवा मालिकेत काम दिलं जायचं, असं प्राजक्ता यांनी म्हटलं आहे. मुलाखतीदरम्यान प्राजक्ता दिघे म्हणाल्या की, ‘पूर्वी आम्हाला आमची कामं बघून दुसरी कामं मिळायची. मला कधीच एकही फोन नाही करावा लागला. पण, आता तुमची ब्ल्यू टिक बघून, तुमचे फॉलोअर्स बघून तुम्हाला कामं मिळतात.’
Maharashtra TimesHema Malini : ‘ते खूप घाबरायचे’, हेमा मालिनी यांनी राजकारणात जाऊ नये अशी धर्मेंद्र यांची इच्छा, अभिनेत्रीचा खुलासा
‘खूप वाईट वाटतं. जेव्हा हेच ब्ल्यू टिक वाले, फॉलोअर्स असलेले सेटवर येतात, तेव्हा त्यांना एक धड वाक्य बोलता येत नाही. तुम्ही रील करता ते वेगळं आणि मालिकेत काम करणं वेगळं.’ असं प्राजक्ता यांनी शेवटी म्हटलं आहे. ‘अभिजात मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्ता दिघे बोलत होत्या.

Dnyanesh Wadekar | रुमाल अन् प्रेमपत्र.. नागराजनं सांगितलं खऱ्या आयुष्यात त्यांचं लग्न कसं ठरलं!

गार्गी फुले यांनीही सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरबद्दल भाष्य केलेलं. गार्गी म्हणालेल्या की, ‘फॉलोअर्स बघून काही वाहिन्यांनी सोशल मिडिया इन्फ्लूएन्सरला कामंसुद्धा दिली. पण, ते कलाकार नाहीत, स्टार आहेत. खूप जण म्हणतात, आम्ही कंटेंट करतो, त्याची मेहनत नाहीये का? मी म्हणेन आहे तुमची मेहनत. पण, अभिनय हा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा अभिनेता किंवा अभिनेत्री हा मुद्दा नाही येऊ शकत. कलाकारांची १०-१० वर्षांची मेहनत आहे. पण रील स्टार म्हणतो मी अभिनेता आहे, तर ते योग्य नाही.’
Maharashtra TimesRaja Chaudhary : ‘लग्नानंतरही एका अभिनेत्यासोबत तिचं अफेअर होतं’, श्वेता तिवारीबद्दल एक्स पती राजा चौधरीचा धक्कादायक दावा
दरम्यान, प्राजक्ता दिघे यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘का रे दुरावा’, ‘चार दिवस सासूचे’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरतेय.