Headlines

IMD Issues Red Alert to Three Districts of Vidarbha School Holiday Announced in Nagpur


नागपुरात मंगळवारी दीड तासात तब्बल 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात पुढचे काही दिवस असाच मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे बुधवारी विदर्भातील तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

vidarbha news
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : नागपूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आणि भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी नागपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी आणि कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी २८ ते ३० जुलैदरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मंगळवारी नागपूर शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी २.३० वाजेपर्यंत शहरात १०८ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतरही शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहिला.

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. काही ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यांवर तसेच नागरिकांच्या घरांच्या परिसरात शिरल्याने मोठी गैरसोय झाली. काही शाळांच्या परिसरातही पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे बुधवारी पावसाचा जोर आणखी वाढल्यास पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, नागपूर महानगरपालिका क्षेत्रासह नागपूर ग्रामीण, हिंगणा आणि कामठी तालुक्यांतील सर्व सरकारी आणि खासगी अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांना २९ जुलै रोजी सुट्टी राहणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

विदर्भात तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट

दरम्यान, २९ जुलै रोजी नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. ३० जुलै रोजी चंद्रपूरला रेड अलर्ट, तर भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत विदर्भात भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे सर्वाधिक १३९ मिमी पावसाची नोंद झाली. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे १०३.४ मिमी पाऊस झाला असून दोन्ही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सखल भागात जाणे टाळावे तसेच नदी-नाले आणि जलमय रस्त्यांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मेघगर्जना सुरू असताना उघड्यावर थांबू नये आणि झाडाखाली आश्रय घेऊ नये. वीज पडण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा