Headlines

Guru Purnima 2026 Wishes, shubhechha, quotes, whatsapp facebook instagram status in Marathi; गुरुपौर्णिमेच्या खास मराठी शुभेच्छा, संदेश, मेसेज आणि कोट्स


Guru Purnima 2026 Wishes, Messages, Quotes In Marathi : गुरुपौर्णिमा हा ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा पवित्र दिवस आहे. या खास दिवशी आपल्या आयुष्यात मार्गदर्शन करणाऱ्या गुरु, शिक्षक, आई-वडील आणि ज्येष्ठ व्यक्तींप्रती आदर व्यक्त करण्यासाठी मनापासून शुभेच्छा देणे ही सुंदर परंपरा आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने WhatsApp, Facebook, Instagram किंवा इतर सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश, प्रेरणादायी कोट्स आणि मनाला स्पर्श करणारे मेसेज येथे दिले आहेत. आपल्या गुरूंना कृतज्ञतेचा नम्र सलाम करत हा दिवस अधिक संस्मरणीय बनवा.

gurupornima 2026 wishes
gurupornima 2026 wishes
गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर कृतज्ञतेचा, आदराचा आणि ज्ञानाला वंदन करण्याचा पवित्र दिवस आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर आपल्याला दिशा दाखवणारा, योग्य-अयोग्याची जाणीव करून देणारा आणि जीवन अधिक समृद्ध करणारा प्रत्येक जण हा आपल्या अर्थाने ‘गुरू’च असतो. आई-वडील, शिक्षक, मित्र, निसर्ग, अनुभव आणि समाज प्रत्येकाकडून आपण काही ना काही शिकत असतो. या पवित्र दिवशी आपल्या गुरूंप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर परंपरा आहे. एक साधा संदेश, एक प्रेमळ शुभेच्छा किंवा मनापासून व्यक्त केलेले आभारही नात्यांना अधिक दृढ बनवू शकतात. याच भावनेतून आम्ही गुरुपौर्णिमेच्या खास शुभेच्छा संदेशांचा हा संग्रह तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे संदेश तुम्ही आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना, शिक्षकांना, सहकाऱ्यांना किंवा सोशल मीडियावर शेअर करून या दिवसाचा आनंद अधिक खास बनवू शकता. ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या प्रत्येक गुरूला वंदन करत, सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरूपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा

गुरूपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा

ज्यांनी मला घडवलं
या जगात लढायला शिकवलं
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे
गुरूपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

आईची माया
बाबांची सावली
हेच आपले गुरू माऊली
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरूंना मनःपूर्वक वंदन

गुरूंना मनःपूर्वक वंदन

ज्यांनी आयुष्याला योग्य दिशा दिली
अशा प्रत्येक गुरूंना मनःपूर्वक वंदन
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरु साक्षात परब्रह्म

गुरु साक्षात परब्रह्म

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु,
गुरुदेवो महेश्वर…
गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करुन सोडी, सकळं जना,
तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु,
जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु,
जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु,
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंना वंदन

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंना वंदन

गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड,
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुविना आपले अस्तित्व नाही

गुरुविना आपले अस्तित्व नाही

गुरुविना मति नाही,
गुरु विना गती नाही,
गुरुविना आपले अस्तित्व नाही
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरूपौर्णिमा 2026

गुरूपौर्णिमा 2026

गुरुविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरू सुखाची सावली

गुरू सुखाची सावली

गुरु तू जगाची माऊली, जणू सुखाची सावली
गुरू म्हणजे, तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

हीच प्रार्थना चरणी आपल्या गुरूवर्य

हीच प्रार्थना चरणी आपल्या गुरूवर्य

गुरुजी तुमच्या कृपेने आमचा झाला आहे उद्धार
आज जे काही आहोत आम्ही हे तुमचेच आहेत उपकार
नेहमी असू द्या तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हावर
हीच प्रार्थना चरणी आपल्या गुरूवर…!

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!

योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता
खोटे काय, खरे काय ते आपण समजावता
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!

गुरु म्हणजे माय बापं, नाम घेता हरतील पाप

गुरु म्हणजे माय बापं, नाम घेता हरतील पाप

आदी गुरूसी वंदावे |
मग साधनं साधावे ||
गुरु म्हणजे माय बापं |
नाम घेता हरतील पाप ||
गुरु म्हणजे आहे काशी |
साती तिर्थ आहे तया पाशी ||
तुका म्हणे ऐंसे गुरु |
चरण त्याचे हृदयीं धरू ||
आजच्या दिवसानिमित्त सर्वांना माझ्याकडुन
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

अक्षर अक्षर आम्हास शिकवता
शब्द शब्दांचा अर्थ सांगता
कधी प्रेमाने तर कधी रागाने
जीवन जगणे आम्हास शिकवता
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!

गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!

गुरु म्हणजे आहे काशी
साती तीर्थ तया पाशी
तुका म्हणा ऐंसे गुरु
चरण त्याचे हृदयी धरू
गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!

प्रतीक्षा सुनील मोरे

लेखकाबद्दलप्रतीक्षा सुनील मोरेप्रतीक्षा सुनील मोरे या एक अनुभवी आणि कुशल मराठी कंटेंट रायटर व पत्रकार असून त्यांना मीडिया आणि डिजिटल क्षेत्राचा सुमारे 12 वर्षांपेक्षा प्रदीर्घ अनुभव आहे. पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ABP Majha या प्रख्यात वृत्तवाहिनीमधील इंटर्नशिपपासून केली. कालांतराने त्यांनी वृत्तवाहिनी, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि OTT माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत आपली कारकीर्द सातत्याने उंचावत नेली आहे.

पुढे त्यांनी TV9 मराठी वृत्तवाहिनीत पूर्णवेळ पत्रकारिता सुरु केली, जिथे प्रत्यक्ष रिपोर्टिंग आणि बातमी संकलनाच्या प्रक्रियेत त्यांची पत्रकार म्हणून भक्कम जडणघडण झाली. घटनास्थळी जाऊन बातम्यांचा मागोवा घेणं, तथ्य पडताळणं आणि प्रेक्षकांपर्यंत विश्वासार्ह माहिती पोहोचवणं या मूलभूत पत्रकारितेच्या मूल्यांवर त्यांची भक्कम पकड आहे.

पत्रकारीतेमधील अनुभवानंतर त्यांनी kesari tours and travels कंपनीत ट्रॅव्हलिंग व टूरिझम या विषयावरही प्रभावी लिखाण करत Travelling क्षेत्रातही अनुभव संपादन केला. त्यानंतर त्यांना Zee Entertainment OTT प्लॅटफॉर्मवर क्रिएटीव्ह राईटिंगच्या कौशल्यावर नवी जबाबदारी हाताळण्याची संधी मिळाली. येथे त्यांनी डिजिटल कंटेंटच्या सादरीकरणातील बारकावे आत्मसात केले. कंटेंटची मांडणी, अचूक वर्गीकरण आणि प्रेक्षकांच्या आवडीनुसार सादरीकरण, मराठी मालिकांचे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आकर्षक Synopsis लिखाण या प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याखेरीज कारकीर्दीच्या अनेक टप्प्यावर त्यांनी स्क्रिप्ट रायटिंग, स्टोरी डेव्हलपमेंट आणि सोशल मीडिया हाताळण्याचा व्यापक अनुभव मिळवला.

कथा आणि स्क्रिप्ट लेखन, वेबसाईट व ब्लॉगसाठी लेखन, अचूक संपादन कौशल्य आणि कठोर डेडलाईन्समध्ये काम पूर्ण करण्याची क्षमता हे त्यांच्या व्यावसायिक व्यक्तिमत्त्वाचे ठळक गुण आहेत . विषयाचा सखोल अभ्यास करून तो सोप्या, स्पष्ट, वाचकांच्या मनाला भिडेल व पटेल आणि परिणामकारक भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवणे, हे त्यांच्या लेखनाचं बलस्थान आहे. नियोजनबद्ध कामाची सवय, संघटन कौशल्य आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता यामुळे त्या प्रत्येक जबाबदारीत यशस्वी ठरल्या आहेत .

गेल्या 6 वर्षांपासून प्रतीक्षा या लाइफस्टाईल विभागासाठी सातत्याने काम करत आहेत. फॅशन, हेल्थ, रिलेशनशिप, प्रेग्नेंसी पॅरेंटिंग, प्रवास, करिअर आणि बदलत्या जीवनशैलीशी निगडित विषयांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. केवळ ट्रेंड सांगणं नव्हे, तर त्या ट्रेंडमागची कारणं, सामाजिक परिणाम आणि वाचकांच्या दैनंदिन आयुष्यात त्याचा उपयोग कसा होऊ शकतो, हे सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

गंभीर रिसर्च करण्याची सवय, विषयांमध्ये बारकाईने शिरण्याची वृत्ती आणि प्रत्येक लेखातून वाचकांना काहीतरी नवं देण्याची धडपड यामुळे प्रतीक्षा यांनी लाइफस्टाईल पत्रकारितेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वाचकांना केवळ माहिती देणं नव्हे, तर त्यांना विचार करायला लावणं आणि त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा देणं, हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश असतो.

कामाव्यतिरिक्त त्यांना वाचन, स्वतःसाठी लेखन, प्रवास आणि व्यायामाची विशेष आवड आहे . विविध विषयांवरील वाचनामुळे त्यांच्या लेखनाला अधिक खोली मिळते, तर प्रवासातून मिळणारे अनुभव त्यांच्या आशयाला व्यापक दृष्टिकोन देतात. सातत्य, अभ्यासू वृत्ती आणि लेखनावरील प्रामाणिक प्रेम यामुळे प्रतीक्षा सुनील मोरे यांनी डिजिटल पत्रकारितेत स्वतःची वेगळी आणि ठाम ओळख निर्माण केली आहे.

शैक्षणिक दृष्ट्या त्यांनी Journalism या विशेष विषयासह Bachelor of Mass Media ही पदवी कीर्ती महाविद्यालय, मुंबई येथून 2015 साली पूर्ण केली आहे. शिक्षणातून मिळालेलं तांत्रिक ज्ञान आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव यांचा संगम त्यांच्या लेखनात स्पष्टपणे दिसून येतो.आणखी वाचा