Headlines

Praveen Tarde Mulshi Land Grab Controversy; Social Media Post Trends


दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, यात त्यांनी कोणाचेही थेट नाव न घेता मुळशीतील शेतकऱ्यांच्या लाटलेल्या जमिनींवर भाष्य करत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या या पोस्टवरून हीच आ

.

प्रवीण तरडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मुळशीमध्ये रिंगरोड आला. पण मागच्या 5 वर्षात रोडच्या आजूबाजूला शेतजमिनी कोणी कोणी लाटल्या.. सगळ्यांचा हिशोब होणार.. मूळ मालक शेतकरीच!” अशी पोस्ट तरडे यांनी केली आहे. यावरून हे नेमके ‘मुळशी पॅटर्न 2’ संदर्भात आहे की राजकीय पोस्ट आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. प्रवीण तरडे यांनी केलेल्या पोस्टसोबत एक कॅप्शनही लिहिले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, “आता मोठे मोठे अंगावर येतील.. पण पर्याय नाही. शेवटी मुळशीकर आहे.. बोलावं तर लागणारच..” असे त्यांनी म्हटले आहे.

प्रवीण तरडे यांनी ही पोस्ट शेअर करताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव झाला असून, अवघ्या काही वेळातच कमेंट सेक्शन भरून गेले. अनेक चाहत्यांनी ‘मुळशी पॅटर्न 2’ असा उल्लेख करत त्यांच्या आगामी चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता व्यक्त केली आहे.

मुळशी पॅटर्न 2 बद्दल काय म्हणाले प्रवीण तरडे?

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी आगामी प्रोजेक्ट्सबाबत माहिती दिली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, “देऊळ बंद 2 नंतर शक्यतो मी मुळशी पॅटर्न 2 कडे वळेन. पहिल्या भागातून मी शेती विकायची नसते, ती जपायची असते हा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. ‘मुळशी पॅटर्न 2’मध्ये सर्वसामान्यांच्या आयुष्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. तुझ्या-माझ्या घराचे स्वप्न इतके महाग का झाले? याचे उत्तर सिनेमातून मिळेल…” असे त्यांनी त्या मुलाखतीत म्हटले होते.

मुळशी पॅटर्न 2 ची प्रेक्षकांना उत्सुकता

2026 हे वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी खऱ्या अर्थाने सुगीचे ठरले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या वर्षात प्रदर्शित झालेल्या अनेक दमदार चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची घसघशीत कमाई केली. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटानंतर सर्वाधिक चर्चा राहिली ती प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाची. ज्याला प्रेक्षकांचा अतिशय उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळाला होता. आता मुळशी पॅटर्न 2 ची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत