Tatkal Ticket Booking Rules: तुम्ही रेल्वे स्टेशनवरील आरक्षण काउंटरवरून वारंवार तत्काळ तिकीट बुक करत असाल, तर 1 ऑगस्टपासून लागू होणाऱ्या नवीन नियमांविषयी माहिती असली पाहिजे. रेल्वेने टोकन प्रणालीमध्ये बदल केले असून 1 ऑगस्टपासून बुकिंग प्रक्रिया पूर्वीपेक्षा सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे.

तात्काळ तिकीट बुकिंगचा नियम बदलला
भारतीय रेल्वे 1 ऑगस्टपासून तत्काळ तिकिटांच्या काउंटर बुकिंगसाठी नवीन टोकन प्रणाली लागू करणार आहे. यामुळे काउंटरवरील गर्दी कमी होऊन प्रवाशांसाठी बुकिंग प्रक्रिया सोपी होईल, असा यामागील उद्देश आहे.
Salary Savings: बंगळुरूत महिन्याला दोन लाख पगार असून गरीब असल्यासारखे वाटते! युवकाने गणित मांडलं, आता तुम्हीच पाहा
आधी टोकन घ्यावे लागायचे आणि नंतर तिकीट काढण्यासाठी पुन्हा काउंटरवर उभे राहावे लागायचे, अशी याआधी अनेक प्रवाशांनी तक्रार केलेली. प्रवाशांनी तक्रार केली जायचा आणि गर्दी वाढायची. हीच गैरसोय दूर करण्यासाठी नवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
काय आहे रेल्वेचा नवीन नियम
1 ऑगस्टपासून लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार, AC तत्काळ तिकिटांसाठी सकाळी 8:30 ते 9:00 या वेळेत टोकन दिले जातील. त्यानंतर नॉन-एसी म्हणजे स्लीपर क्लाससाठी तत्काळ तिकिटांसाठी सकाळी 9:00 ते 9:30 या वेळेत टोकन दिले जातील. अशाप्रकारे बुकिंग सुरू होण्याआधी प्रवाशांना टोकन दिले जावे, ज्यामुळे काउंटरवर जलद प्रक्रिया होईल आणि अनावश्यक गर्दी टाळता येईल, हा या नव्या बदलाचा उद्देश आहे. यामुळे काउंटरवरील धक्काबुक्की आणि लांब रांगांची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे.
Joint Property Rights: भाऊ किंवा पार्टनरने तुमच्या नकळत घर, जमीन विकली तर काय कराल? प्रत्येक Co-Owner ला माहिती असावेत आपले अधिकार
रेल्वेने प्रत्येक आरक्षण काउंटरसाठी टोकनची संख्याही निश्चित केली असून प्रत्येक काउंटरवरून AC तत्काळ तिकिटांसाठी 10 टोकन आणि नॉन-एसी (स्लीपर) तत्काळ तिकिटांसाठी 15 टोकन दिले जातील. तसेच नव्या नियमानुसार स्वतःसाठी किंवा कुटुंबीयांसाठी तत्काळ तिकीट बुक करायला येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल आणि गरज पडल्यास कौटुंबिक नाते सिद्ध करणारा वैध दस्तऐवज सादर करावे लागतील. यानंतर इतर प्रवाशांच्या बुकिंगची प्रक्रिया केली जाईल.
रेल्वेच्या नव्या नियमाचा प्रवाशांना काय फायदा
प्रवाशांना तत्काळ तिकीटासाठी आता वारंवार आरक्षण काउंटरवर जावे लागणार नाही, हा या टोकन प्रणालीचा सर्वात मोठा फायदा मानला जात आहे. टोकन आगाऊ मिळाल्यामुळे प्रवासी आपल्या पाळीची आरामात वाट पाहू शकतील, ज्यामुळे काउंटरवरील गर्दीही कमी होईल आणि तिकीट बुकिंग प्रक्रिया सोपी होऊ शकेल.
Billionaire Divorce: आयुष्यभर कमावलं, घटस्फोटात गमावलं! दक्षिण कोरियात अब्जाधीशाचा घटस्फोट, पत्नीला देणार 944 अब्ज वोनची पोटगी
त्याचवेळी याआधी प्रवाशांना टोकनसाठी एका वेगळ्या काउंटरवर जावे लागायचे, त्यानंतर तिकीट बुक करण्यासाठी पुन्हा रांगेत उभे राहावे लागायचे. म्हणजे प्रवाशांना दोनदा काउंटरवर जावे लागायचे, पण आता नव्या प्रणालीमुळे ही धावपळ लक्षणीयरीत्या कमी होईल अशी अपेक्षा आहे.
तात्काळ तिकीट बुक करताना कागदपत्रे जवळ बाळगा
दुसरीकडे, तुम्ही तत्काळ तिकीट बुकिंगसाठी रेल्वेच्या काउंटरवर जात असाल तर तुमच्यासोबत तुमचे आधार कार्ड किंवा इतर वैध फोटो ओळखपत्र जवळ बाळगा. तसेच प्रवाशांची नाव, वय आणि प्रवासाशी संबंधित सर्व माहिती आगाऊ तयार ठेवावी ज्यामुळे तिकीट बुकिंग प्रक्रियेला गती मिळू शकेल.

