Headlines

Nashik Newly Wed Couple dies Together in Bike Car Accident at Kalvan Pilkos Phata; अंत्यविधींना जाताना काळाचा घाला, नवदाम्पत्याचा करुण अंत, लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यात एकत्रच शेवट


Nashik Couple Accident Death : ​दिनेश व कीर्ती हे तिची बहीण त्रिशासह दुचाकीवरून प्रतापपूर येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जात होते. खामखेड्याकडून पिळकोसकडे येणाऱ्या मॅक्झिमोची त्यांच्या दुचाकीला जोरात धडक बसली.

Nashik Newly Wed Couple Accident Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, नाशिक : जिल्ह्यात कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्याजवळ रविवारी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास मॅक्झिमो वाहन आणि दुचाकीच्या धडकेत नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू झाला, तर पत्नीची बहीण गंभीर जखमी आहे. दिनेश करणसिंग गावित व कीर्ती दिनेश गावित अशी मृतांची नावे आहेत.

अंत्यविधीला जाताना अपघात

दिनेश व कीर्ती आणि कीर्तीची बहीण त्रिशा गावित दुचाकीवरून प्रतापपूर येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जात होते. खामखेड्याकडून पिळकोसकडे येणाऱ्या मॅक्झिमोची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.

तिघांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दिनेश व कीर्ती यांचा मृत्यू झाला. त्रिशाची प्रकृती गंभीर आहे.

शिक्षिका पत्नी, तर पती जलसंपदा विभागात

कीर्ती अभोणा येथील जनता विद्यालयात शिक्षिका होत्या, तर दिनेश जलसंपदा विभागात कार्यरत होते. मे महिन्यातच त्यांचा विवाह झाला होता. नवदाम्पत्याच्या मृत्यूने कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Maharashtra TimesArchita Rahar : प्रधानांचा राजीनामा, भाजप खासदाराच्या कन्येची आनंदात इन्स्टा पोस्ट, डिलीट करण्याची सूचना मिळताच म्हणाली, आता आईला फोन करतील
पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रामदास गवळी व शिपाई नितीन वाघमारे पुढील तपास करीत आहेत.

इंदिरानगर बोगद्याजवळ चार वाहनांचा अपघात

दुसरीकडे, नाशिक–मुंबई महामार्गावरील इंदिरानगर बोगद्याजवळील उड्डाणपुलावरील रॅम्पवर रविवारी (दि. २६) सकाळी चालकाचे भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवित हानी टळली, तरी चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले. तासभर वाहतूकही ठप्प झाली होती.

जितेंद्र आव्हाड-एकनाथ शिंदे एकाच मंचावर; भर कार्यक्रमात जुगलबंदी रंगली

नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक रॅम्पवरून उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट दुभाजकावर जाऊन धडकला. त्याचवेळी मागून येणाऱ्या भाजीपाल्याने भरलेल्या पिकअप वाहनाच्या चालकाने अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्यावर पलटी झाली. त्यानंतर मागून येणारी स्विफ्ट कार आणि आणखी एक वाहनदेखील एकमेकांवर आदळल्याने या चार वाहनांचा विचित्र अपघात झाला.

या अपघातात जीवित हानी टळली, तरी काहींना किरकोळ दुखापत होऊन सर्वच वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
Maharashtra TimesSanjay Jadhav : साथ सोडली, नाराजी मांडली, तरी म्हणतात उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! ठाकरेंना सोडणाऱ्या संजय जाधवांच्या पोस्टने आश्चर्य
विशेष म्हणजे शनिवारी (दि. २५)देखील याच अपघातस्थळी ट्रकसह दोन वाहनांचा अपघात झाला होता. एकाच भागात सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाल्याने या रॅम्पवर दिशादर्शक फलक, वेगमर्यादेच्या सूचना आणि आवश्यक तेथे सुरक्षाविषयक उपाययोजना तातडीने करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा