विद्यार्थ्यांचा विजयोत्सव तरी ठाकरेंच्या नावाचा जयघोष, आदित्य ठाकरेंनी रोखलं, काय घडलं? – aaditya thackeray stop thackeray slogans at students victory rally video goes viral
विद्यार्थ्यांचा विजयोत्सव तरी ठाकरेंच्या नावाचा जयघोष, आदित्य ठाकरेंनी रोखलं, काय घडलं? – aaditya thackeray stop thackeray slogans at students victory rally video goes viral
आदित्य ठाकरे यांच्या एका कृतीने मुंबईतील विजयोत्सवाच्या रॅलीत अनेकांची मनं जिंकली. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क परिसरात ठाकरे बंधूंच्या वतीने तिरंगा विजय जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. विशेष म्हणजे हा विजय विद्यार्थ्यांचा आहे, त्यामुळे या आंदोलनात ठाकरेंच्या नावाच्या घोषणा नको, अशा सूचना ठाकरेंनी आधीच दिल्या होत्या. पण स्टेजवरच या घोषणा सुरू झाल्या हे पाहता आदित्य ठाकरे लगेच पुढे सरसावले आणि त्यांनी घोषणा रोखत ‘वंदे मातरम्’च्या घोषणा द्यावा, असे सांगितलं. आदित्य ठाकरेंच्या या कृतीने उपस्थितांची मनं जिंकल्याचं पाहायला मिळालं.