भारत आणि झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले होते. २० ओव्हरमध्ये २१९-५ धावा केल्या. यामध्ये ईशान किशन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतके झळकवली. ईशानने सर्वाधिक ८१ धावा तर तिलक वर्मा ६० धावांवर नाबाद राहिला. झिम्बाब्वेकडून सिकंदर सोडता सर्व गोलंजदाजांनी एक-एक विकेट नावावर केली. आजच्या सामन्यात भारताची सलामीची जोडी अपयशी ठरली.
भारताकडून सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांना मोठी सुरुवात करता आली नाही. १० धावांवर असताना अभिषेक शर्मा आऊट झाला. त्यानंतर वैभवने तडी द्यायला सुरूवात केलेली पण तोही २० धावांवर आऊट झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांनी डावाची सूत्रे हातात घेतली. ४२ चेंडूत ६६ धावांची भागीदारी धावांनी केली. त्यानंतर अय्यरही २५ धावा करून परतला. तिलक वर्माने आज त्याच्यावर जी टीका होते त्याला आपल्या बॅटिंगमधून उत्तर दिलं, गडी शेवटपर्यंत नाबाद राहिला. ईशानसोबत त्याने ९४ धावांची भागीदारी करत संघाला २०० च्या जवळपास पोहोचवले. शतकाजवळ आलेला ईशान ८१ धावांवर आऊट झाला. शेवटी दुबेन एक षटकार मारत २१९ पर्यंत पोहोचवले. IND vs ZIM 2nd T20 : भारत हरला काय जिंकला काय पण कॅप्टन श्रेयस अय्यरकडे तब्बल 88 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्याची संधी, नेमका कोणता? दरम्यान, आजच्या सामन्यामध्ये ईशान किशन याने ४४ चेंडूत ८१ धावा करताना ९ चौकार आणि २ षटकार मारले. त्यासोबतच तिलक वर्मा यानेही अवघ्या २९ चेंडूत ६० धावा फटकावल्या, त्यानेही आपल्या खेळीमध्ये ५ चौकार आणि ३ षटकार मारले. दोघांनी केलेली ९६ धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली. खास करून तिलक वर्मा याच्या स्लो खेळल्याने टीका झाली, आज त्याने त्याची ताकद दाखवली. त्यासोबतच ईशान किशननेही जगातील नंबर वनचा फलंदाज का आहे हे दाखवून दिले. आता भारतीय गोलंदाज किती धावांवर यजमानांना रोखतात हे पाहावं लागणार आहे. India vs West Indies ODI: टीम इंडियात मोठा उलटफेर, 8 धुरंधरांचा पत्ता कटणार, श्रेयस, इशान, बुमराह आगामी सीरिज मुकणार? नेमकं कारण समोर भारत (प्लेइंग 11): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (WK), श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, यश ठाकूर, मयंक यादव
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा