Headlines

Nanded FDA Raids Hotel Savera and Kavita Licenses Suspended Tukaram Mundhe Action Mode; खिचडीत जिवंत अळी तर बिर्याणीत माशी, नागरिकांच्या जीवाशी खेळ, मालकांचे धाबे दणाणले; FDA कडून नांदेडमध्ये प्रसिद्ध हॉटेल्सचे परवाने रद्द


Nanded Hotel Kavita and Savera License Suspended : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी राज्यात कारवाईचा धडाका सुरु आहे. अशातच नांदेड जिल्ह्यामधील दोन हॉटेल्सचा परवाना निलंबित केला आहे.

Nanded Hotel Kavita and Savera License Suspended
नांदेड अन्न व औषध प्रशासन रेड(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : हॉटेलमधील अस्वच्छता आणि नियमांचं उल्लंघण करणं दोन हॉटेल चालकांना चांगलंच भोवलं आहे. अस्वच्छता आणि अनियमितता आढळून आल्याने नांदेड शहरातील हॉटेल सवेरा आणि हॉटेल कविता या दोन हॉटेल्सचे थेट परवाने रद्द करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकानं ही कारवाई केली आहे. तर एका हॉटेलवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. एफडीएच्या या कारवाईमुळे शहरातील नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.

अस्वच्छता आणि गंभीर त्रुटी

तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात कारवाईचा धडाका सुरु आहे. एफडीएच्या पथकाकडून हॉटेल, उपहारगृह, खाद्यगृह तसेच विविध अन्न आस्थापनांची व्यापक तपासणी केली जात आहे. भेसळ खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई देखील केली जात आहे. या तपासणी मोहिमेदरम्यान नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात असलेल्या हॉटेल सवेरा या हॉटेलमध्ये अस्वच्छता आणि गंभीर त्रुटी पथकाला आढळून आल्या. हॉटेल सवेरा ही चिकन- मटण बिर्याणीसाठी प्रसिद्ध असल्याची माहिती आहे.
Maharashtra TimesChandrakant Patil : आंबा चोरला म्हणून फाशी नसते, ‘नीट’ पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरु कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेसची टीका

खिचडीमध्ये जिवंत अळी

गंभीर त्रुटी आढळून आल्यानं संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. तसेच खिचडी भज्जेसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल कविता या आस्थापनेचाही अन्न परवाना गंभीर अनियमिततेमुळे निलंबित करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनानं दिली आहे. विशेष म्हणजे कविता हॉटेलमध्ये काही दिवसापूर्वी खिचडीमध्ये जिवंत अळी आढळली होती. सोशल मीडियावर व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यानुसार एफडीएनं हॉटेलचा परवाना रद्द केला आहे. याशिवाय अन्य एका हॉटेलमध्ये बिर्याणीत मृत माशी आढळून आल्याची ऑनलाईन तक्रार ग्राहकानं केली होती, त्यानुसार पथकाने हॉटेलची तपासणी केली. तपासणीसाठी नमुने देखील घेतले. अहवाल आल्यानंतर या हॉटेलवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठाही जप्त

याशिवाय ताडी दुकान क्रमांक 12, नवा मोंढा, नांदेड येथून 158 लिटर साठा (किंमत 7 हजार 110 रुपये) जप्त करून नष्ट करण्यात आला. संबंधित व्यावसायिकाकडे खरेदी बिल अथवा वाहतूक परवाना (ट्रान्सपोर्ट पास) उपलब्ध नसल्याने आणि गंभीर त्रुटी आढळल्यामुळे या आस्थापनेचाही अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला. मोहिमेदरम्यान विविध औद्योगिक आस्थापनांमधून मोठ्या प्रमाणात रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठाही जप्त करण्यात आला.
Maharashtra TimesMaharashtra Weather: कोकणात मुसळधार पावसाने झोडपलं, मराठवाडा-विदर्भात पावसाची प्रतीक्षा; येत्या दोन आठवड्यांत कसं असेल हवामान?
त्यामध्ये श्री स्वामी समर्थ ऑईल ट्रेडिंग, एमआयडीसी, नांदेड येथून 3 हजार 148 लिटर (किंमत 5 लाख 19 हजार 420 रुपये), श्रीनिवास ऑईल अँड फूड्स, हदगाव येथून 1 हजार 363 लिटर (किंमत 2 लाख 45 हजार 340 रुपये), ज्ञानाई स्पाईसेस, कृष्णूर एमआयडीसी, नायगाव येथून 1 हजार 61 लिटर (किंमत 3 लाख 53 हजार 800 रुपये) तसेच आयुष ओमकार इंडस्ट्रीज, एमआयडीसी, नांदेड येथून 1 हजार 78 किलोग्रॅम रिफाइंड सोयाबीन तेल (किंमत 1 लाख 86 हजार 494 रुपये) जप्त करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासनाचा इशारा

नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व हॉटेल, उपहारगृह, खाद्यगृह आणि अन्न सेवा आस्थापनांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 तसेच संबंधित नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा