Tharala Tar Mag New Promo Big Twist: छोट्या पडद्यावरच्या ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांना एक मोठा धक्का बसणार आहे. मालिकेत आता एक अनपेक्षित वळण येणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मराठी टीव्ही विश्वात टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी असलेल्या ‘ ठरलं तर मग ‘ या मालिकेत प्रेक्षकांना हादरवून सोडणारा एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. याचा एक प्रोमो नुकताच स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय.
खरं तर गेले अनेक दिवस सायलीच्या विनाशाची वाट पाहणाऱ्या प्रिया आणि महिपत शिखरेचा डाव अखेर यशस्वी झाल्यानं आता प्रेकक्षांना मोठा धक्का बसला आहे.या प्रोमोत पाहायला मिळतंय की, गरोदर असलेल्या सायली थेट पोलिसांच्या ताब्यात आहे. तिच्या हातात बेड्या आहेत.
डोहाळेजेवणा सोहळा अन् मोठा ट्विस्ट सायली गरोदर असल्यानं सुभेदार कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. मालिकेच्या आगामी भागांमध्ये डोहाळेजेवणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडताना दिसणार आहे. डोहाळेजेवणाचा सोहळा सुरू असतानाच अचानक पोलिसांची एन्ट्री होते, अन् चित्रच बदलतं. सायलीवर गंभीर आरोप वात्सल्य आश्रमातील अल्पवयीन मुलींच्या बेकायदेशीर तस्करीच्या गुन्ह्याखाली सायलीला अटक करण्यात येते. सायली निर्दोष आहे याची १००% खात्री संपूर्ण सुभेदार कुटुंबाला असते, तरीही पोलिसांच्या हातात ठोस कागदपत्रे असल्यानं सगळेच हतबल होतात. Aastad Kale Video Post: ‘सगळे बाजारात विकून घ्यायला बसलेले नाहीत’आस्ताद काळेच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा, ट्रोल करणाऱ्याला चांगलंच सुनावलं मास्टरमाइंड प्रिया अन् महिपतचा डाव महिपत शिखरेनं स्वतः केलेले गुन्हे लपवण्यासाठी ‘बाबा’ बनून बुवाबाजीचा मुखवटा धारण केलाय. या संपूर्ण कपटकारस्थानाची मुख्य सूत्रधार दुसरी कोणी नसून प्रिया आहे. प्रियानं महिपतच्या मदतीनं सर्व पुरावे अशा प्रकारे रचले की, तपासाची सुई थेट सायलीकडे वळली आहे.
जावा जावा एकाच जेलमध्ये अटकेनंतर पोलिसांच्या गाडीत बसणाऱ्या गरोदर सायलीला पाहून अर्जुन खचून न जाता तिला मोठा धीर देतो. “तू अजिबात काळजी करू नकोस… मी तुला यातून नक्की बाहेर काढेन. आता रडायचं नाही, लढायचं आणि जिंकायचं!” असा निर्धार अर्जुन आणि सायली व्यक्त करतात.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा