Headlines

पुणे जिल्ह्यात 62 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती |Maharashtra Times


म. टा. प्रतिनिधी, पुणे: जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून या शेतकऱ्यांचे प्रत्येकी दोन लाख असे एकूण ५२३ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे, असे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन्मदिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचे उद्घाटन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी त्या बोलत होत्या. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे, ‘म्हाडा, पुणे’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते.
Maharashtra TimesMonsoon Tourism: पर्यटक! छे… नुसती बेशिस्त झुंड; वर्षासहलींच्या नावाखाली सह्याद्रीच्या कुशीतील पर्यटनस्थळी धुडगूस, कारवाई कधी होणार?
‘कृषी समृद्धी कर्ज योजनेंतर्गत जिल्हा बँकेच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे. ऊस शेतीमध्ये एआयचा वापर वाढवल्यास उत्पादनात ४० टक्के वाढ होईल. पाणीबचत आणि खतांचा वापर कमी होईल,’ असे पवार यांनी सांगितले.

Maharashtra TimesPMPML CNG Buses: निधी तिजोरीत, बस कागदावरच; एक हजार सीएनजी बसपासून पुणेकर वंचित, प्रवाशांचे हाल कधी थांबणार?
‘दोन लाखांपुढील रक्कम भरल्यास कर्जमाफी’
‘लोकप्रतिनिधी, व्यावसायिक आणि कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेतून वगळले आहे. पात्र शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२७ पर्यंत दोन लाखापुढील थकीत रक्कम भरल्यास राज्य सरकार दोन लाख रुपये जमा करील ,’ अशी माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली.

६१,९०० —- कर्जमाफी मिळणारे जिल्ह्यातील शेतकरी
२ लाख रुपये —- प्रत्येकी मिळणारी कर्जमाफी
५२३ कोटी रुपये —- कर्जमाफीचे एकूण मूल्य

तसेच, छत्रपती संभाजीनगरमध्येही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना होणार असून केवायसी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी केवायसी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आणि माजी खासदार डॉ. भागवत कराड यांनी केले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत