कमी बजेटमध्ये नवीन मोबाईल शोधणाऱ्या ग्राहकांसाठी भारतीय स्मार्टफोन ब्रँड लावा (Lava) ने दोन नवीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. 12 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येणारे ‘Lava Virat V1 5G’ आणि ‘Virat V1 4G’ हे मॉडेल्स मध्यमवर्गीय ग्राहकांच्या खिशाला परवडणारे असून, यामध्ये उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि आधुनिक डिझाईन देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया.

Lava Virat V1 5G आणि Lava Virat V1 4G स्मार्टफोन ग्राहकांसाठी लाँच करण्यात आले आहेत. हे दोन्ही परवडणारे स्मार्टफोन कमी किंमतीत लाँच करण्यात आले आहेत, या फोनमध्ये तुम्हाला दोन कलर ऑप्शन आणि 6.75 इंचाचा डिस्प्ले मिळेल. 5G व्हेरिएंटमध्ये कंपनीने फोनमध्ये 6000mAh बॅटरी आणि 4G फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी फोनला IP64 रेटिंग देण्यात आले आहे.
Lava Virat V1 5G किंमत भारतात किती?
लावा स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे, इंट्रोडक्टरी ऑफरअंतर्गत हा फोन 11,999 रुपयांना विकला जाईल. Lava Virat V1 4G प्राइसबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने 4G व्हेरिएंटची किंमत 9999 रुपये निश्चित केली आहे आणि हा फोन तुम्हाला 8999 रुपयांच्या खास लाँच किंमतीत मिळेल.
या प्राइस रेंजमध्ये, 5G मॉडेल Ai+ Pulse 2, Realme Narzo 80 Lite, Samsung Galaxy M07 आणि Infinix SMART 10 सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल. दुसरीकडे, 4G मॉडेल REDMI 13C, POCO C65 आणि Motorola G13 सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.
Lava Virat V1 5G फीचर
- OS: 5G मॉडेल Android 16 वर कार्य करते तर 4G मॉडेल Android 15 वर कार्य करते.
- डिस्प्ले: दोन्ही फोनमध्ये 6.75 इंचाचा एचडी प्लस रिझोल्यूशन डिस्प्ले आहे.
- चिपसेट: 5G मॉडेलमध्ये Unisoc T8200 प्रोसेसर, 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आहे. हा फोन 4 GB व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह येतो आणि एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 TB पर्यंत वाढवू शकतो. 4G मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर, या हँडसेटमध्ये 4 GB रॅम आणि 4 GB व्हर्च्युअल रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेजसह युनिसॉक SC9863A प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.
- कॅमेरा: 5G आणि 4G मॉडेलमध्ये AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला आहे.
- बॅटरी: 5G मॉडेलमध्ये 6000 mAh ची बॅटरी आहे, तर 4G मॉडेलमध्ये 5000 mAh ची बॅटरी आहे.

