Headlines

Bihar NEET Protesters Run Away With Police Barricades Viral Videos Shock Internet | आंदोलनात बिहारींचा धुमाकूळ! पोलिसांचं सामान केलं गायब, बॅरिकेड्स, काठ्या, हेल्मेट घेऊन लोक पळाले, पाहा व्हिडीओ


Viral Protest Video: नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनादरम्यान बिहारमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहून तुम्ही देखील डोक्याला हातच लावाल

NEET Paper Leak
(फोटो सौजन्य – sudhir361kumar, hindustansociety/Instagram)
देशभरात सध्या नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. तुमच्यापैकी अनेकांनी सोशल मीडियावर या आंदोलनाचे व्हिडिओ पाहिले असतील. हे आंदोलन सुरू असताना काही ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली, तर काही ठिकाणी लोकांनी शांततेत प्रशासनाविरोधात निदर्शनं केली. मात्र, बिहारमधील आंदोलन पाहून तुम्हीही हैराण व्हाल. या आंदोलकांनी पोलिसांनाही जेरीस आणलं. किंबहुना, त्यांना रोखण्यासाठी ज्या साहित्याचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेच साहित्य घेऊन लोक पळू लागले. बिहारमधील आंदोलनाचे हे व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

लोकांना रोखणार कसं?

​ ​

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकं अनोखी आहेत, असं म्हटलं जातं. कारण इतर राज्यांमध्ये लोकांच्या घरातील मौल्यवान वस्तू चोरीला जातात. पण इथे नदीवरील पूल, नव्याने बांधलेले रस्ते, रेल्वेचे रूळ, पोलिसांच्या गाड्या अशा अनेक गोष्टी चोरीला गेल्याच्या घटना चर्चेत आल्या आहेत. हीच गोष्ट विद्यार्थी आंदोलनातही पाहायला मिळाली. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावले होते. मात्र, आंदोलक तेच बॅरिकेड्स घेऊन पळाले. त्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे सोडण्यात आले. पण उलट लोक रेन डान्स करू लागले.

पोलिसांच्या काठ्या, हेल्मेट आणि शिल्डही नेले

​ ​

पोलिसांनी दोरीचा वापर केल्यानंतर जणू रस्सीखेच स्पर्धाच सुरू झाली. याशिवाय काही आंदोलकांनी पोलिसांच्या काठ्या, हेल्मेट आणि शिल्डही घेऊन पळ काढल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. वास्तविक हा प्रकार गंभीर आहे. किंबहुना, विद्यार्थ्यांचं आंदोलन हा मुळातच एक गंभीर मुद्दा आहे. मात्र, ज्या गोष्टींसाठी बिहारवर कायम टीका केली जाते, त्याच गोष्टी आता आंदोलनाच्या निमित्ताने इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहेत. असो, हे व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्या मनात काय विचार आले? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा