Headlines

भारत वि. झिम्बाब्वे पहिला टी-20 सामना, प्लेइंग 11 मधील आपल्यापेक्षा झिम्बाब्वेची बॉलिंग अनुभवी; 2 खेळाडू करणार डेब्यू


मुंबई : वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतील विजेतेपदानंतर भारतीय संघ सात सामने खेळला आहे. त्यातील सहा गमावले आहेत. आयर्लंडमधील दोन्ही, तर इंग्लडमधील पाचपैकी चार लढतींत भारतास पराभवास सामोरे जावे लागले. इंग्लंडमधील एक लढत अनिर्णित राहिली होती. श्रेयसच्या नेतृत्वाखालील पहिला विजय भारतास आज खूणावत आहे. ‘खेळात कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत हे आम्ही जाणले आहे. इंग्लंडमध्ये आम्हाला अपयशास सामोरे जावे लागले. मात्र, त्यातही काही सकारात्मक घडले होते. आम्हाला भविष्यासाठी संघ घडवण्यासाठी काय करायला हवे हे त्या मालिकेतून कळले. त्याचबरोबर मालिकेस सामोरे जाताना मानसिकता कशी हवी, खेळाशी कसे जुळवून घ्यावे याचीही जाणीव झाली, असे श्रेयसने आवर्जून नमूद केले. आजच्या सामन्यात प्लेइंग ११ मध्ये भारतीय फलंदाजी दमदार दिसतेय, पण गोलंदाज मात्र नवीन आहेत. कदाचित आज दोन खेळाडू गोलंदाज पदार्पण करू शकतात. नेमका कोण जाणून घ्या.

या मालिकेसाठी भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणात मोठा बदल दिसेल. प्रिन्स यादव आणि मयंक यादव यांच्यासोबत अशोक शर्मा आणि यश ठाकूर या दोन नव्या खेळाडूंची टीम इंडियात पहिल्यांदाच निवड झाली आहे. अनुभव पाहता प्रिन्स आणि मयंक कर्णधार श्रेयसपेक्षा थोडे वरचढ आहेत. त्यामुळे दोन्ही नवोदितांपैकी फक्त एकालाच पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबत हर्ष दुबे हासुद्धा आजच्या सामन्यामध्ये प्लेइंग ११ मध्ये असू शकतो. अफगाणिस्तानविरूद्ध झालेल्या वन डे सामन्यात त्याने पदार्पण केले होते. त्यामुळे आज टी-२० फॉरमॅटमध्ये त्याचे पदार्पण होण्याची दाट शक्यता आहे.
Maharashtra TimesIND vs ZIM T20 Series : भारत-झिम्बाब्वे सामने फ्रीमध्ये कुठे पाहायचे? वेळ बदलली, नवीन चॅनेलवर होणार थेट प्रक्षेपण
झिम्बाब्वेसाठी भारताचा संघ : श्रेयस अय्यर (C), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (VC), इशान किशन (WK), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग (WK)
Maharashtra TimesTeam India : आयर्लंडनंतर इंग्लंडने धडा शिकवला, आता झिम्बाब्वेची धमकी; टीम इंडियाला मोठं आव्हान, मालिकेपूर्वी श्रेयस अय्यर काय म्हणाला?
या संघामध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज दिसणार नाहीत. त्यामुळे युवा खेळाडूंवरच संपूर्ण जबाबारी असणार आहे. भारताच्या वनडे संघामध्ये अनुभवी खेळाडू आहेत. टी-२० मालिकेत आयपीएल गाजवलेले युवा गोलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11 : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (WK), श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, यश ठाकूर/अशोक शर्मा, मयंक यादव.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत