Headlines

दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मंगळवेढा शहरात काँग्रेसतर्फे तीव्र निषेध:दिल्लीतील लाठीहल्ल्याचा निषेध, विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी;



दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवेढा पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना निवेदन देण्यात आले. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर काय

.

यावेळी काँग्रेसचे राज्य सचिव ॲड रविकरण कोळेकर, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष ॲड राहुल घुले, राजन ठेंगील, रवींद्र शिवशरण, बापू अवघडे, तसलीम अकुंजी, सत्तार इनामदार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर संत दामाजी चौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताची लोकशाही व्यवस्था प्रत्येक नागरिकाला आपले मत व्यक्त करण्याचा, शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा आणि न्याय्य मागण्यांसाठी आवाज उठविण्याचा घटनात्मक अधिकार प्रदान करते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बळाचा वापर करण्याऐवजी त्यांच्या मागण्या शांततेने ऐकून घेऊन संवादाच्या माध्यमातून तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, लाठीहल्ल्यामुळे लोकशाही मूल्यांना धक्का बसला असून, विद्यार्थी व नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधित व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

घटनेची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करण्यात यावी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत