सलमान खाननं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि तरुण पिढीचा आवाज ऐकून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केलं आहे. विद्यार्थ्यांच्या या शांततापूर्ण संघर्षात त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज असल्याचंही त्यानं म्हटलंय.
काय म्हटलंय सलमान खाननं त्याच्या पोस्टमध्ये?
ही एक अत्यंत शांततापूर्ण चळवळ होती; तिला हिंसक वळण लागलं याचं खूप दुःख वाटतंय. ज्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुखापत झाली, त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती वाटते. प्रश्नपत्रिका फुटणं (पेपर लीक) ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. आपल्या देशातील मुले एका चांगल्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी एकत्र आली आहेत आणि त्यांच्या पालकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे, हे पाहून मला बरं वाटतंय.
विद्यार्थ्यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी मनापासून कौतुक करतो. त्यांनी दाखवलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम करून स्वतःचं भविष्य घडवण्याची तसंच एक महान व सुशिक्षित भारत निर्माण करण्याची त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. हे आंदोलन किंवा हा विरोध हीच योग्य पद्धत आहे आणि विद्यार्थ्यांनी ते अत्यंत शांततेनं केलं आहे. ते खरोखरच धैर्यवान आणि शूर आहेत. शिक्षणाप्रती समर्पित आणि प्रेरित असलेली ही पिढी भारताचा नक्कीच गौरव वाढवेल.
Ayesha Khan : ‘महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मला जबरदस्तीनं व्हॅनमध्ये ओढलं’, ‘धुरंधर’ फेम आयेशा खानला पोलिसांनी घेतलेलं ताब्यात, काय घडलं?
हा मुद्दा विद्यार्थी आणि शैक्षणिक व्यवस्था यांच्यातील आहे; याचं राजकारण केलं जाऊ नये. याचं संपूर्ण श्रेय आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच दिलं पाहिजे. मला खात्री आहे की सरकारही त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि शैक्षणिक व्यवस्था अधिक बळकट करेल. ही सर्वांसाठीच फायदेशीर अशी स्थिती आहे. सकारात्मक निर्णयाची आशा आणि प्रार्थना करतो.
शिक्षण हीच पुढची ‘ट्रेंड’ आणि ‘फॅशन’ बनली पाहिजे आणि ती दरवर्षी अधिक लोकप्रिय व आकर्षक झाली पाहिजे; इतकी की परदेशातून लोक शिक्षणासाठी भारतात येतील आणि भारत एक ‘एज्युकेशनल हब’ (शिक्षणाचे प्रमुख केंद्र) बनेल.
सलमाननं या पोस्टमध्ये सीजेपी किंवा कोणत्याही पक्षाचा उल्लेख न करत केवळ विद्यार्थ्यांना पाठिंबा असल्याचं नमूद केलंय.
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
सलमानने ही पोस्ट शेअर करताच काही मिनिटांतच ती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. लाखो चाहत्यांनी आणि विद्यार्थ्यांनी या पोस्टवर कमेंट करत सलमान खानच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. “तरुणांचा आवाज उठवण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी ‘भाईजान’ पुढे आला,” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
Manoj Muntashir : ‘CJP आंदोलक विद्यार्थी हे देशद्रोही,पूर्ण जबाबदारीनेच बोलतोय’, बॉलिवूडमधील लेखकाचे वक्तव्य, नेटकऱ्यांचा संताप
नेमकंकाय घडलंय?
गेल्या काही दिवसांपासून शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा व्हावी, NEET पारदर्शकतेसाठी CJP च्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. जंतर-मंतरसह देशातील विविध भागांत विद्यार्थ्यांचे हे आंदोलन तीव्र होत चाललं आहे.
सलमान खानपूर्वी सोनू सूद, प्रकाश राज, शबाना आझमी, आणि सोहा अली खान यांसारख्या अनेक प्रमुख कलाकारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. मात्र, सलमान खानसारख्या बड्या स्टारनं यावर थेट भूमिका घेतल्याने या आंदोलनाला अधिक व्यापक ओळख आणि वजन प्राप्त झालं आहे.

