सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी बाजारपेठ संचयनी सालईवाडा येथील प्रसिद्ध स्क्रॅप व्यापारी मुनाफ फतेहसाब येन्नी (८०) यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. रात्री त्यांच्यावर सालईवाडा कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सावंतवाडी येथील स्क्रॅब व्यापारी मोहिद्दीन उर्फ गौशा येन्नी यांचे वडील, सावंतवाडी बाजारपेठेतील फळविक्रेते रशीद आणि पापा येन्नी यांचे ते भाऊ तर माजगाव महसूल सेवक लियाकत बेग, गवंडी सय्यद मुजावर, गोवा मडगाव येथील मौला अली यांचे ते सासरे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, दोन भाऊ, भावजय, पुतणे, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
