Headlines

MNS Protests Against Smart Meters in Thane March on MSEB Office


ठाण्यात स्मार्ट मीटवर विरोधात मनसे पक्ष आक्रमक झाला आहे. मनसेने स्मार्ट मीटर विरोधात थेट महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.

Thane News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : स्मार्ट मीटर प्रणालीवरून वीज ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना या विरोधात ठाणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयावर बुधवारी धडक दिली. यावेळी दुपारी झोपेत असताना महावितरण अधिकाऱ्यांकडून गुपचूप स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा प्रकार शहरात अनेक उघडकीस आला आहे, असा आरोप मनसेचे नेते व ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात भरमसाठ वाढ होत असून सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक लूट थांबवा अशी मागणी महावितरण अधिकाऱ्यांना निवदेनाद्वारे करण्यात आली.

राज्यासह ठाण्यात स्मार्ट मिटरला नागरिकांचा विरोध आहे. ज्या घरगुती ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत, त्यांच्या वीजबिलात अचानक वाढ झाली असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारी वाढत असल्याने मनसेने वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयासमोर निदर्शने केली.

सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक लूट थांबवा, अशी मागणी मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या अविनाश जाधव यांनी केली. याप्रसंगी मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे, उपशहराध्यक्ष पुष्कर विचारे, सुशांत डोंबे, संदीप साळुंखे, निलेश चव्हाण, सागर भोसले, महिला आघाडीच्या समीक्षा मार्कंडे उपस्थित होते. Maharashtra TimesCJP Protest : दिल्लीत पुन्हा गोंधळ, पोलीस आणि आंदोलक आमनेसामने, नेमकं काय घडलं?

अविनाश जाधव यांची महत्त्वाची मागणी

मीटर बसवण्यापूर्वी जनजागृती करत पूर्णपणे पारदर्शक माहिती प्रसिद्धी करावी, अशी मागणी मनसेचे जाधव यांनी केली. तसेच वीजबिलात वाढ होणार नाही, अशी हमी देण्यात यावी, वीज ग्राहक संघटना, लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्याशिवाय अंमलबजावणी करू नये तसेच तक्रार निवारण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणे सध्या आवश्यक असल्याचे जाधव यांनी नमूद केले

मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा

वीज बिल न भरल्यास अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे आता नागरिकांच्या घरातील मीटर कापण्याचा प्रयत्न केला, तर मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असा इशारा मनसेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. तसेच ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याची जबरदस्ती केली जाईल, त्यांनाही चोख उत्तर दिले जाईल, अशा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला.
Maharashtra TimesSonam Wangchuk Video : मैं अभी जिंदा हुँ, सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश

मीटर प्रणाली विरोधात जनहित याचिका

दरम्यान, या मीटर प्रणाली विरोधातील जनहित याचिकाकर्ते मंदार भट यांनी महावितरण अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारले असता अधिकारीवर्ग निरुत्तर झाले. याप्रश्नी सक्ती करणे, चुकीचे असल्याचे मत भट यांनी व्यक्त केले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा